Join us
Daily Top 2 Weekly Top 5

अचानक कान दुखायला लागतो? पाहा कान ठणकण्याची गंभीर कारणं आणि उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2026 17:30 IST

See the serious causes and remedies for ear pain, health tips, home remedies : कान दुखण्यामागची कारणे आणि उपाय जाणून घ्या.

कान दुखणे ही खूप सामान्य तक्रार आहे, पण त्यामागचे कारण नेहमीच कानाशी संबंधित असेल असे नाही. अनेकदा शरीरातील इतर भागांतील समस्या कानदुखीच्या रूपाने जाणवतात, त्यामुळे नेमके कारण ओळखणे कठीण होते. कानात मळ साचल्यामुळे कान दुखतोच. ( See the serious causes and remedies for ear pain, health tips, home remedies )तसेच सतत हेडफोन्स वापरण्याचाही कानावर परिणाम होतो. पण या शिवायही काही कारणे असतात. 

दातांचा त्रास हे त्यातील एक महत्त्वाचे कारण आहे. दाढ दुखणे, किडलेले दात किंवा हिरड्यांची सूज यामुळे होणारी वेदना कानापर्यंत पोहोचू शकते. दात दुखत असला की कान दुखतोच कारण ते आतून जोडलेले आहेत. त्यामुळे जर दाताच्या काही वेदना असतील तर कानावरही परिणाम होतो. तसेच सायनसचा त्रास, नाक बंद होणे किंवा डोकेदुखी यामुळे कानावर ताण येऊन वेदना जाणवते. सायनस असेल तर हळूहळू मायग्रेन जणवण्याचे कारण हेच आहे. सर्दीमुळे कान दुखतो. घशातील संसर्ग किंवा टॉन्सिल्सची सूज देखील कानदुखीला कारणीभूत ठरू शकते.

खाण्याची पद्धतही महत्त्वाची असते. दातांची हालचाल आणि जबड्याची हालचाल याचाही परिणाम होतो. सतत काहीतरी चघळणे आणि कडक पदार्थ खाऊन जबड्यावर येणाऱ्या तणावामुळे दात चावण्याची सवय लागते. जे लोकं दात खातात त्यांनाही कानदुखीचा त्रास होतो. चुकीच्या पद्धतीने झोपणे यामुळे जबड्याच्या सांध्यावर ताण येतो आणि तो कानाजवळ वेदना निर्माण करतो. याशिवाय, मोठ्या आवाजाच्या वातावरणात राहणे यामुळेही कान थकतात आणि दुखू लागतात. तणाव आणि हवामानातील अचानक बदल हीसुद्धा अनेकदा दुर्लक्षित होणारी कारणे आहेत.

उपाय करताना फक्त कानावर लक्ष केंद्रित न करता मूळ कारण समजून घेणे गरजेचे आहे. हलक्या वेदनेसाठी गरम पाण्याची पट्टी ठेवणे, सर्दी किंवा सायनस असल्यास वाफ घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणे उपयोगी ठरते. मोठ्या आवाजापासून दूर राहणे, हेडफोनचा वापर कमी करणे आणि जबड्याला आराम देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शरीर हायड्रेटेड ठेवणे आणि हलका आहार घेणे यामुळेही त्रास कमी होण्यास मदत होते. जर कानदुखी दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त टिकली, कानातून काही स्त्राव झाला, ऐकण्यात बदल जाणवत असेल किंवा ताप येत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एकंदरीत, कान दुखणे ही लहान गोष्ट वाटली तरी त्यामागे अनेक अनपेक्षित कारणे असू शकतात. त्यामुळे शरीराचे संकेत ओळखून योग्य वेळी काळजी घेणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sudden Ear Pain: Serious Causes, Remedies, and When to Seek Help

Web Summary : Ear pain can stem from dental issues, sinus problems, or even jaw tension. Lifestyle factors like diet, headphone use, and stress also contribute. Home remedies offer relief, but persistent pain, discharge, or hearing changes require prompt medical attention for proper diagnosis and treatment.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडीसोशल व्हायरल