शरीरातील विविध क्रिया व्यवस्थित होत आहेत की नाही हे वेळोवेळी तपासणे फार गरजेचे असते. (See if your Gut health is good or not, observe your own body , health care tips )पण शरीरात खरच काही बिघाड झाला असेल तर ते ओळखायचे कसे? त्यासाठी आपले शरीरच आपल्याला संकेत देते. ते ओळखता आले की आजारपण टाळणं शक्य होतं. पचनक्रिया असेल श्वसनक्रिया असेल इतरही क्रिया जर सुरळीत होत नसतील तर वेगवेगळ्या प्रकारे शरीर प्रतिसाद देते.
शरीरातील आतड्यांची भूमिका फार महत्त्वाची असते. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विविध प्रक्रिया Gut Health वर अवलंबून असतात. मात्र जर त्यात काही बिघाड झाला तर लहान सहान त्रास सुरु होतात. त्रास जरी लहान असले तरी ते नंतर गंभीर स्वरुपाचे होतात. त्यामुळे वेळीच लक्षणे ओळखा आणि काळजी घ्या. आतड्यांचे काम सुरळीत नसेल तर ही काही लक्षणे दिसतात.
१. अनेकदा गट हेल्थ चांगली नसेल तर पोट व्यवस्थित साफ होत नाही. तसेच विष्ठेला फार घाण वास येतो. जो आपल्याला सहन होत नाही. त्यामुळे असा अति घाण वास येत असेल तर नक्कीच आतड्यांचे काम सुरळीत चालू नसते.
२. काहीही खाल्यावर लगेच ब्लोटींग होणे हे ही एक लक्षण आहे. काही तेलकट पदार्थ विकतचे चमचमीत खाल्यावर होणारे ब्लोटींग वेगळ्या कारणामुळे असू शकते. मात्र साधे पौष्टिक अन्न खाल्ले तरीही जर ब्लोटींग होत असेल तर नक्कीच पचनाची प्रक्रिया व्यवस्थित होत नसेल. त्यामागे एक कारण आतड्यांचेही असू शकते.
३. चेहऱ्यावर भरपूर पिंपल्स येण्याला त्वचा विकार तर कारणीभूत असतातच. मात्र पोट साफ नसेल आणि अंतर्गत कार्य व्यवस्थित होत नसेल तरी पिंपल्स येतात. चेहरा जर कायम अशा पिंपल्सनी भरलेला असेल तर नक्कीच पचनाची क्रिया सुरळीत नाही.
४. थकवा, चिडचिड, सतत येणारा राग आणि इतरही काही त्रास होतात. थोडे काम केले तर थकायला होते आणि सारखी चक्कर येते. हे ही आतड्याच्या त्रासाचेच लक्षण आहे.
५. काही पदार्थ अजिबात सहनच होत नाहीत. त्यांचा वासही घ्यावासा वाटत नाही. तोच पदार्थ या आधी तुम्ही खात होतात. मात्र अचानक त्याची ऍलर्जी व्हायला लागली असेल तर त्यात गट हेल्थचा संबंध असू शकतो.