तुळस ही आयुर्वेदातच नाही तर विज्ञानातही महत्त्वपूर्ण आहे. (See how basil extract can help you lose weight, treat colds and coughs)दारासमोर तुळस हवीच असे म्हटले जाते कारण अनेक औषधी फायदे तुळशीमध्ये आहेत. तुळस किती गुणकारी आहे हे माहिती असतानाही आपण तिचा फार उपयोग करत नाही. काही जणं चहामध्ये तुळस घालतात. चटणीमध्ये तुळस घातली जाते. (See how basil extract can help you lose weight, treat colds and coughs)गावाकडे राहणारे लोक रोज सकाळी तुळशीचे पान खातात. एक पान कमालीचे फायदे देऊ शकते.
आपल्याला ताप आल्यावर किंवा खोकला झाल्यावर आजी काढा तयार करून देते. तो प्यायला आपल्याला अजिबात आवडत नाही, कारण तो कडू असतो. मात्र तुम्ही कधी तुळशीचा काढा प्यायला आहे का? तुळशीचा काढा प्रचंड औषधी असतो तसेच चवीलाही मस्त लागतो.
१.तुळशीमध्ये अँण्टी ऑक्सिडंट्स असतात. तसेच ती अँण्टी बॅक्टेरियलही असते. तुळशीमध्ये बरेच गुणधर्म असतात जे रोग प्रतिकारक क्षमता वाढवतात.
२.तुळशीचा वापर केल्याने खोकला बरा होतो. तसेच सर्दी नाहीशी होते. इतरही आजार बरे करण्यासाठी तुळशीचा वापर करता येतो.
३.पचन संस्थेची प्रक्रिया सुरळीत राखण्यासाठी तुळस अत्यंत फायदेशीर ठरते. पोटात अडकलेली घाण शरीराबाहेर निघून जाते. तसेच गॅसेसचे प्रमाणही तुळस खाल्यावर कमी होते.
४.तुळशीचा नियमित वापर केल्याने वजन कमी करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. मधुमेह आटोक्यात आणण्यासाठी तुळस चांगली असते. रक्तही शुद्ध करते.
तुळशीचा काढा
साहित्य
तुळशीची पाने, पाणी, आलं, लवंग, काळं मीठ
कृती
१. एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवा. त्यामध्ये तुळशीची पाने घाला. पाने स्वच्छ धुऊन घ्या. पाण्याचा रंग बदलेपर्यंत उकळून घ्या.
२. त्यामध्ये आलं किसून घाला. नंतर त्यामध्ये पाच ते सहा लवंग घाला. ते ही छान उकळून घ्या.
३. सगळं मस्त उकळलं की गॅस बंद करा आणि गाळून घ्या. वरतून चिमटीभर काळं मीठ टाका. आणि मस्त काढा प्या.
जर तुम्हाला थोडा गोडवा हवा असेल तर त्यामध्ये चमचाभर गूळ किंवा मग मध घाला. चव आणखी छान लागेल.