ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब हा आजच्या जीवनशैलीत वाढता आरोग्याचा प्रश्न बनला आहे. सुरुवातीला याची लक्षणे स्पष्ट दिसत नाहीत, त्यामुळे अनेकांना आपल्याला उच्च रक्तदाब आहे हे उशिरा कळते. पण काही सामान्य कारणांमुळे हा त्रास हळूहळू सुरू होतो. (See How to prevent Blood Pressure problems , know about reasons, these habits are bad for health )ही कारणे समजून घेतली तर त्यावर वेळेत नियंत्रण ठेवता येऊ शकते. आता लहान वयात म्हणजे तरुणपणातच बीपीचा त्रास अनेकांना सुरु होतो. त्याची कारणे नक्की काय असावीत ?
सर्वात पहिले आणि महत्त्वाचे कारण म्हणजे चुकीची आहार पद्धत. जास्त मीठ, तेलकट आणि प्रोसेस्ड पदार्थ खाण्याची सवय असल्यास रक्तदाब वाढण्याची शक्यता जास्त असते. फास्ट फूड, पॅकेज्ड स्नॅक्स आणि बाहेरचे खाणे यामुळे शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते आणि त्याचा थेट परिणाम ब्लड प्रेशरवर होतो.
दुसरे कारण म्हणजे ताणतणाव. सतत कामाचा ताण, चिंता किंवा मानसिक दबाव यामुळे शरीरात हार्मोन्सचे संतुलन बिघडते. त्यामुळे हृदयावर ताण येतो आणि रक्तदाब वाढू शकतो. आजच्या धावपळीच्या जीवनात हे कारण खूप सामान्य झाले आहे. जरा जरी जास्तीचा ताण घेतला की त्याचा थेट परिणाम रक्तदाबावर होतो.
तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे शारीरिक हालचालींचा अभाव. दिवसभर बसून काम करणे, व्यायाम न करणे किंवा चालण्याची सवय नसणे यामुळे शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही. त्यामुळे वजन वाढते आणि हळूहळू ब्लड प्रेशरचा त्रास सुरू होऊ शकतो. चौथे कारण म्हणजे वाढलेले वजन किंवा लठ्ठपणा. जास्त वजन असल्यास हृदयाला शरीरात रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. यामुळे रक्तदाब वाढण्याचा धोका वाढतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे खूप गरजेचे आहे.
पाचवे कारण म्हणजे झोपेची कमतरता. अपुरी झोप, उशिरापर्यंत जागरण किंवा अनियमित झोपेची सवय यामुळे शरीराला योग्य विश्रांती मिळत नाही. त्यामुळे हार्मोनल बदल होतात आणि त्याचा परिणाम रक्तदाबावर होतो. याशिवाय धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या वाईट सवयी, अनुवंशिकता (घरातील इतरांना हा त्रास असणे) आणि वाढते वय ही देखील महत्त्वाची कारणे आहेत. काही वेळा मधुमेह किंवा इतर आजारांमुळेही रक्तदाब वाढू शकतो.
एकंदरीत, ब्लड प्रेशरचा त्रास अचानक होत नाही तर तो आपल्या रोजच्या सवयींमुळे हळूहळू वाढतो. योग्य आहार, नियमित व्यायाम, ताणतणाव कमी ठेवणे आणि चांगली झोप घेणे या साध्या गोष्टींची काळजी घेतल्यास हा त्रास टाळता येऊ शकतो आणि निरोगी आयुष्य जगता येते.
Web Summary : Poor diet, stress, inactivity, weight, and lack of sleep increase blood pressure risk. Addressing these habits through lifestyle changes can help manage and prevent hypertension, promoting a healthier life.
Web Summary : गलत खानपान, तनाव, निष्क्रियता, वजन और नींद की कमी से ब्लड प्रेशर का खतरा बढ़ता है। इन आदतों को जीवनशैली में बदलाव करके प्रबंधित करने और उच्च रक्तचाप को रोकने में मदद मिल सकती है, जिससे स्वस्थ जीवन को बढ़ावा मिलता है।