Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दीर्घायुष्याचं वरदान देणारा ‘हा’ सुगंधी मसाला, जेवणानंतर इवलासा तुकडा चघळा-शुगरही राहील नियंत्रणात...

दीर्घायुष्याचं वरदान देणारा ‘हा’ सुगंधी मसाला, जेवणानंतर इवलासा तुकडा चघळा-शुगरही राहील नियंत्रणात...

secret kitchen spice for diabetes : best spice for diabetes control : natural spice to control blood sugar : रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी दालचिनी अत्यंत गुणकारी मानली जाते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2025 17:55 IST2025-12-22T17:54:00+5:302025-12-22T17:55:43+5:30

secret kitchen spice for diabetes : best spice for diabetes control : natural spice to control blood sugar : रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी दालचिनी अत्यंत गुणकारी मानली जाते...

secret kitchen spice for diabetes best spice for diabetes control natural spice to control blood sugar | दीर्घायुष्याचं वरदान देणारा ‘हा’ सुगंधी मसाला, जेवणानंतर इवलासा तुकडा चघळा-शुगरही राहील नियंत्रणात...

दीर्घायुष्याचं वरदान देणारा ‘हा’ सुगंधी मसाला, जेवणानंतर इवलासा तुकडा चघळा-शुगरही राहील नियंत्रणात...

सध्याच्या काळात बदलती लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे 'डायबिटीस' नियंत्रणात ठेवणे अनेकांना खूपच अवघड वाटते. रक्तातील वाढलेली साखर केवळ शरीराला थकवा देत नाही, तर ती इतर अनेक आजारांना निमंत्रण देते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारातील छोट्या-छोट्या बदलांकडे लक्ष देणे गरजेचे असते. खरंतर, डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या जेवणात वापरली जाणारी दालचिनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी 'इन्सुलिन' सारखेच काम करते. डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी, घरगुती आणि नैसर्गिक उपायांमध्ये 'दालचिनी' वरदानच ठरते. आयुर्वेदात दालचिनीला औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण मानले जाते, कारण ती इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवते आणि ग्लुकोज पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते(best spice for diabetes control).

योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने दालचिनीचा समावेश केल्यास डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासोबतच हृदय आरोग्य, पचनक्रिया आणि रोगप्रतिकारक शक्तीही सुधारू शकते. केवळ पदार्थाची चव वाढवण्यासाठीच नाही, तर रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी दालचिनी अत्यंत गुणकारी मानली जाते. मसाल्याच्या डब्यातील दालचिनी फक्त पदार्थांचा स्वादच वाढवत नाही, तर ती डायबिटीसच्या रुग्णांसाठी एखाद्या औषधापेक्षा कमी नाही. रक्तातील ग्लुकोजची पातळी संतुलित ठेवण्यासाठी दालचिनी फायदेशीर घरगुती उपाय ठरू शकतो. दालचिनी खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती ते पाहूयात. डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी (natural spice to control blood sugar) दालचिनी कशी फायदेशीर याबद्दल आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. 

डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनी कशी फायदेशीर... 

आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांच्या मते, दालचिनी हा केवळ जेवणाची चव वाढवणारा मसाला नसून त्यात अनेक महत्वाचे औषधी गुणधर्म असतात. हे शरीराला इन्सुलिनचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यास मदत करते. दररोज दालचिनीचा एक छोटा तुकडा आपल्या आहारात समाविष्ट केला, तर रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहण्यास मोठी मदत मिळते. दालचिनी इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी (Insulin Sensitivity) सुधारते, ज्यामुळे शरीरातील पेशी ग्लुकोजचा योग्य वापर करू शकतात. यामुळे 'फास्टिंग ब्लड शुगर' कमी होते आणि जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. दालचिनीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्यास मदत करतात. दालचिनी केवळ ब्लड शुगरच नियंत्रित करत नाही, तर संपूर्ण 'मेटाबॉलिक सिस्टम' सुधारण्यास मदत करते. 

मसाल्याच्या डब्यांतील 'या' पानांचा प्या मॅजिकल चहा! वजन होईल झरझर कमी, दिसाल स्लिम ट्रिम... 

PCOS/PCOD मुळे सुटलेली 'ढेरी' आता होईल पटकम कमी! फक्त आहारात करा ३ सोपे बदल... 

डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनीचा वापर कसा करावा? 

१. दिवसभरात अर्धा टीस्पून दालचिनी पावडरचा वापर पुरेसा आहे.

२. सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीचा चहा घेऊ शकता.

३. जेवणानंतर दालचिनीचा एक छोटा तुकडा चघळा. यामुळे पचन सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

४. दालचिनी पावडर सॅलॅड किंवा फळांवर वरून भुरभुरवून खाऊ शकता.

५. दालचिनीचा काढा करून पिणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

Web Title : दालचीनी: दीर्घायु और मधुमेह नियंत्रण के लिए सुगंधित मसाला।

Web Summary : दालचीनी इंसुलिन संवेदनशीलता में सुधार और रक्त शर्करा को नियंत्रित करके मधुमेह को प्रबंधित करने में मदद करती है। इसे चाय के माध्यम से, भोजन के बाद एक छोटा टुकड़ा चबाकर, या भोजन में मिलाकर दैनिक रूप से शामिल करें। यह हृदय स्वास्थ्य, पाचन और प्रतिरक्षा को भी बढ़ावा देता है।

Web Title : Cinnamon: The fragrant spice for longevity and diabetes control.

Web Summary : Cinnamon helps manage diabetes by improving insulin sensitivity and regulating blood sugar. Incorporate it daily through tea, chewing a small piece after meals, or adding to food. It also boosts heart health, digestion, and immunity.