Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रक्तातली साखर-कोलेस्टेरॉल कमी करणारं इटुकलं फळ, पंतप्रधान मोदींनीही सांगितले होते त्याचे फायदे

रक्तातली साखर-कोलेस्टेरॉल कमी करणारं इटुकलं फळ, पंतप्रधान मोदींनीही सांगितले होते त्याचे फायदे

PM Modi on sea buckthorn: ayurvedic fruits for diabetes: immunity boosting fruits: समुद्री बकथॉर्न हे एक पर्वतीय फळ आहे ज्याला हिमालयाचे पवित्र फळ असं म्हटलं जाते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2025 17:40 IST2025-06-27T17:39:25+5:302025-06-27T17:40:19+5:30

PM Modi on sea buckthorn: ayurvedic fruits for diabetes: immunity boosting fruits: समुद्री बकथॉर्न हे एक पर्वतीय फळ आहे ज्याला हिमालयाचे पवित्र फळ असं म्हटलं जाते.

sea buckthorn health benefits for diabetes and cholesterol natural remedies for blood sugar control | रक्तातली साखर-कोलेस्टेरॉल कमी करणारं इटुकलं फळ, पंतप्रधान मोदींनीही सांगितले होते त्याचे फायदे

रक्तातली साखर-कोलेस्टेरॉल कमी करणारं इटुकलं फळ, पंतप्रधान मोदींनीही सांगितले होते त्याचे फायदे

बदलेल्या जीवनशैलीनुसार निरोगी राहणं हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. (sea buckthorn health benefits) सतत जंकफूड, अपुरी झोप आणि ताण-तणावामुळे आपल्याला अस्वस्थ वाटू लागते.(ayurvedic fruits for diabetes) यामुळे आपण वेगवेगळ्या आजारांना बळी पडतो. स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला आरोग्याची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. (Health Tips)
भारतातील अनेक राज्यात विविध पदार्थ बनवले जातात तर काही पदार्थ पिकवले जातात. त्यातील एक समुद्री बकथॉर्न. हे एक पर्वतीय फळ आहे ज्याला हिमालयाचे पवित्र फळ असं म्हटलं जाते.(immunity boosting fruits) पिवळ्या केशरी रंगाच्या या छोट्या बेरीज अनेक पोषक तत्वांचा खजिना आहे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हे फळ खाण्याचा सल्ला दिला आहे.(PM Modi on sea buckthorn) समुद्री बकथॉर्नमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, ओमेगा फॅटी ॲसिड आणि अनेक खनिजे भरपूर प्रमाणात असतात. या फळाला पॉवरहाऊस म्हणून ओळखले जाते. 

महिलांना हाय बीपीचा त्रास होण्याचं प्रमाण वाढतं आहे! चिडचिडू नका, करा ३ सोपे उपाय
 

सी बकथॉर्नचे फायदे 

1. सी बकथॉर्नमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यास मदत करते. यामुळे आपल्याला अनेक आजार आणि संसर्गापासून वाचण्यास मदत होते. 

2. समुद्री बकथॉर्न रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. यात असणारे संयुगे इन्सुलिन करण्यास आणि ग्लुकोज चयापचय सुधारु शकतात. इतकेच नाही तर अँटीऑक्सि़डंट्स आणि दाहक-विरोधी संयुगे देखील यात असतात. जे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. 

3. या फळामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा फॅटी ॲसिड आहे. ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यास मदत करतात. तसेच त्वचेला मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात. ज्यामुळे त्वचा तरुण आणि चमकदार राहते. 

4. आपल्याला गॅस, बद्धकोष्ठता किंवा अपचनाच्या समस्या होत असतील तर या फळामुळे पचन सुधारु शकते. हे फळ हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. यात असणारे अँटीऑक्सिडंट्स ताण आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे हृदयाचे एकूण आरोग्य सुधारते. तसेच शरीरात जमा झालेले खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास आणि रक्तवाहिन्या आणि धमन्यांमधील अडथळे टाळण्यास मदत करते. 

5. सी बकथॉर्न हे फळ आपण सहज खाऊ शकतो. या फळाचा रस बनवून देखील पिता येतो. हे पावडर किंवा कॅप्सूलच्या स्वरुपात देखील मिळते. हे फळ खाण्यापूर्वी डॉक्टरांचे मत घ्या. 

 

Web Title: sea buckthorn health benefits for diabetes and cholesterol natural remedies for blood sugar control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.