प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले.(Satish Shah kidney failure) ते बऱ्याच काळापासून किडनीच्या गंभीर समस्यांपासून त्रस्त होते. त्यांच्या अभिनयाने त्यांनी अनेकांची मने जिंकली. हिंदूजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.(signs of kidney disease) 'हम साथ साथ है', 'मै हूँ ना' ते टीव्हीवरील 'साराभाई व्हर्सेस साराभाई' सारख्या अनेक टीव्ही सिरीयल आणि चित्रपटात त्यांनी आपली महत्त्वाची भूमिका बजावली.(kidney failure symptoms after 50) यापूर्वी देखील अनेक कलाकारांना किडनी फेलमुळे आपला जीव गमवावा लागला. किडनी फेल होणं किंवा मूत्रपिंड निकामी होणे म्हणजे काय? हा आजार नेमका कशामुळे होतो जाणून घेऊया. (kidney disease age 50+)
किडनी निकामी होणे ही आरोग्याची गंभीर समस्या आहे. ज्यामध्ये सगळ्यात आधी मूत्रपिंड आपले कार्य योग्यप्रकारे करु शकत नाही. मूत्रपिंडाचे कार्य हे शरीरातून कचरा आणि पाणी काढून टाकण्याचे काम करते. तसेच मीठ, खनिज आणि द्रव संतुलन राखण्यास मदत करते. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो आणि लाल रक्तपेशी तयार होतात. जेव्हा मूत्रपिंड निकामी होते तेव्हा शरीरात विषारी पदार्थ जमा होतात. ज्यावर वेळीच उपचार न केल्यास आपल्याला गंभीर समस्येला सामोरे जावे लागू शकते.
मूत्रपिंड निकामी होण्याची अनेक कारणे असू शकतात. जर आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढली किंवा मधुमेहाचा आजार असेल तर यामुळे मूत्रपिंडाच्या रक्तवाहिन्यांना हळूहळू नुकसान पोहचवू शकते. उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडांवर अतिरिक्त ताण येतो. यामुळे त्याची फिल्टरिंग क्षमता कमी होते. मूत्रपिंडातील संसर्ग किंवा स्टोन मूत्रमार्गात अडथळा आणून त्यांना नुकसान देखील पोहोचवते.
सध्या किडनी फेल होण्याची समस्या वाढताना दिसत आहे. यामध्ये सगळ्यात आधी हात, पाय आणि चेहरा सुजतो, थकवा आणि अशक्तपणा येऊ लागतो. लघवीचे प्रमाण कमी होते किंवा रंग अधिक गडद दिसू लागतो. मळमळ, उलट्या आणि भूक न लागणे, श्वास लागणे किंवा छातीत दुखण्याच्या समस्या अधिक वाढतात.
मूत्रपिंड निकामी होण्यापासून रोखण्यासाठी आपल्याला रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रित ठेवणे जास्त गरजेचे आहे. त्यासाठी आपण भरपूर पाणी प्यायला हवं. हानिकारक औषधांचा जास्त वापर टाळा. तसेच योग्य प्रमाणात संतुलित आहार घ्या. दररोज व्यायम करा आणि जर मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर मूत्रपिंडाची नियमित तपासणी करा.
