lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कान्हाला आवडतो साळीच्या लाह्यांचा नैवेद्य, प्रसाद म्हणून लाह्या खाण्याचे ८ आरोग्यदायी फायदे

कान्हाला आवडतो साळीच्या लाह्यांचा नैवेद्य, प्रसाद म्हणून लाह्या खाण्याचे ८ आरोग्यदायी फायदे

Sali Lahya Importance benefits Krishna Janmashtami Gokulashtami : साळीच्या लाह्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असल्याने या लाह्यांना विशेष महत्त्व असते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2023 12:26 PM2023-09-05T12:26:46+5:302023-09-05T12:30:38+5:30

Sali Lahya Importance benefits Krishna Janmashtami Gokulashtami : साळीच्या लाह्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असल्याने या लाह्यांना विशेष महत्त्व असते.

Sali Lahya Importance benefits Krishna Janmashtami Gokulashtami : Kanha likes the offering of sali lahyas, 8 health benefits of eating lahyas as prasad | कान्हाला आवडतो साळीच्या लाह्यांचा नैवेद्य, प्रसाद म्हणून लाह्या खाण्याचे ८ आरोग्यदायी फायदे

कान्हाला आवडतो साळीच्या लाह्यांचा नैवेद्य, प्रसाद म्हणून लाह्या खाण्याचे ८ आरोग्यदायी फायदे

श्रावण महिना आला की नागपंचमी, राखीपौर्णिमा, कृष्ण जन्माष्टमी आणि गोकुळअष्टमी असे एकामागून एक सण येतात. त्यानंतर येणारा गणेशोत्सव हा तर राज्यभरात साजरा होणारा सर्वात मोठा सण. हे सगळे सण साधारणपणे पावसाच्या काळात येत असल्याने या काळात आपल्या प्रत्येकाची पचनशक्ती मंद झालेली असते. त्यामुळे या काळात जड पदार्थ खाल्ले तर ते पचत नाही. या दिवसात हलका आहार घ्यायला हवा असं आवर्जून सांगितलं जातं. म्हणूनच नागपंचमी असो किंवा जन्माष्टमीचा सण अगदी गोकुळाष्टमीचा गोपाळकाल्यासाठीही साळीच्या लाह्यांचा आवर्जून वापर केला जातो (Sali Lahya Importance benefits Krishna Janmashtami Gokulashtami). 

धान्यांना जेव्हा भट्टीमध्ये भाजून उष्णता दिली जाते, तेव्हा लाह्या तयार होतात. उष्णता मिळाल्यामुळे लाह्या पचनास हलक्या होतात. त्यांच्यातील कॅलरीज अतिशय कमी होतात. लाह्यांमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. लाह्यांमध्ये लोह, तंतू, फॉस्फरस, क्षार, कॅल्शियम,  व्हिटॅमिन डी, थायमिन, राइबोफ्लेव्हिन योग्य प्रमाणात असतात. साळीच्या लाह्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असल्याने या लाह्यांना विशेष महत्त्व असते. पाहूयात साळीच्या लाह्यांचे शरीराला होणारे विविध फायदे..

१. अॅसिडीटीवर उपयुक्त 

हल्ली वेगवेगळ्या कारणांनी बऱ्याच जणांना अॅसिडीटी होते. कधी जागरणामुळे, तर कधी जेवणाच्या वेळा बदलल्यामुळे, कधी आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे अॅसिडीटीचा त्रास होतो. अशावेळी साळीच्या लाह्या अतिशय गुणकारी ठरतात. उपाशी पोटी साळीच्या लाह्या खाल्ल्यास आणखीनच चांगला उपयोग होतो. 

(Image : Google)
(Image : Google)

२. कफविकारासाठी उत्तम 

पाऊस किंवा थंडीच्या दिवसांत सर्दी - कफ यांसारखे त्रास उद्भवतात. पण साळीच्या लाह्या खाल्ल्यास कफ कमी होण्यास मदत होते आणि आराम पडू शकतो. त्यामुळे लहान मुलांनाही साळीच्या लाह्या देण्याचा सल्ला अनेकदा घरातील ज्येष्ठ मंडळींकडून दिला जातो. 

३ . पचनक्रिया सुधारते

लाह्या खाल्ल्यामुळे शरीराचे मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचय क्रिया सुधारते. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होते आणि शरीरातील चरबी वाढत नाही. तसेच मळमळ, उलट्या, ॲसिडिटी, जुलाब असे पचनासंबंधी असणारे आजारही लाह्यांच्या सेवनामुळे बरे होतात. कॉन्स्टिपेशनचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनीही आहारात नियमितपणे लाह्या खाव्या. 

४. अशक्त लोकांसाठी लाभदायक

लाह्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारे अन्नघटक मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे अशक्त व्यक्तींसाठीही लाह्या खाणे फायद्याचे असते. लाह्या पचायला जरी हलक्या असल्या तरी शक्ती देणाऱ्या असतात. त्यामुळे ॲनिमिक व्यक्तींनीही दररोज लाह्या खाव्या.

५. हाडांना मिळते मजबूती

लाह्यांमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे हाडांना बळकटी देण्यासाठी लाह्या अतिशय उपयुक्त ठरतात. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी नियमितपणे लाह्या खाव्या. हाडांसोबतच दात आणि केस मजबूत करण्यासाठीही लाह्या खाण्याचा सल्ला दिला जातो. 

६. सौंदर्य खुलण्यास फायदेशीर 

लाह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारून सौंदर्य वाढविण्यासाठीही लाह्या खाणे फायदेशीर आहे. साळीच्या लाह्यांची पावडर दुधात मिसळून त्वचेवर लावली जाते, तो एक उत्तम फेसपॅक आहे. त्यामुळे चेहऱ्यावरचे फोड, वांगाचे डाग, सुरकुत्या कमी होतात.

७.  महिलांमधील समस्यांवर गुणकारी 

मासिक पाळीदरम्यान महिलांना पोटदुखी, अंगदुखी, कंबरदुखी असे त्रास होतात. मात्र नियमितपणे साळीच्या लाह्या खाल्ल्यास हे त्रास काही प्रमाणात कमी होऊ शकतात. PCOS आणि PCOD यांसारखे त्रास असणाऱ्यांनीही लाह्या खाल्ल्यास फयदेशीर ठरतात. 

८. हृदयाचे कार्य सुधारण्यास मदत 

 हृदय व रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत करण्यासाठी लाह्या अतिशय उपयुक्त असतात. रक्तदाब नियंत्रणात राहण्यासही लाह्यांचा उपयोग होतो. त्यामुळे भविष्यात हृदयविकार उद्भवू नये किंवा उद्भवला असेल तर तो आटोक्यात राहण्यासाठी लाह्या खाणे हा सर्वोत्तम उपाय आहे. 
 

Web Title: Sali Lahya Importance benefits Krishna Janmashtami Gokulashtami : Kanha likes the offering of sali lahyas, 8 health benefits of eating lahyas as prasad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.