Join us   

सद्गुरुंवर मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वी-डोक्याला होती सूज, मेंदूचे विकार का होतात, लक्षणं-उपाय पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 2:28 PM

Sadhguru Jaggi Vasudev Brain Surgery : सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर ब्रेन सर्जरी, हा त्रास कशाने होतो?

अध्यात्मिक क्षेत्रातील प्रसिद्ध गुरु म्हणजेच सद्गुरू जग्गी वासुदेव. (Sadhguru Jaggi Vasudev) अलिकडेच सद्गुगुरूंवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. ब्रेन सर्जरी करण्यात आली अशी पोस्ट शेअर करण्यात आली. मेंदूला सूज आणि ब्लिडींगमुळे ब्रेन सर्जरी करावी लागली आणि दिल्लीतील अपोलो रुग्णालयात ही सर्जरी पार पडली न्युरोलॉजिस्ट डॉ. विनीत सुरी यांच्या हवाल्याने सांगण्यात आले. सद्गुगुरूंची तब्येत आता पूर्णपणे ठीक असून हळूहळू त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. (Sadhguru Jaggi Vasudev Brain Surgery)

अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या चार आठवड्यांपासून डोकेदुखी होत होती. पण ते या वेदनांकडे दुर्लक्ष करत होते. त्यांनी औषधं घेऊन रोजच्या नॉर्मल एक्टिव्हिटीज केल्या. १५ मार्चला वेदना असह्य झाल्यामुळे त्याचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. ज्यात मेंदूला सूज आणि ब्लिडींग होत असल्याचं दिसून आलं. १७ तारखेला त्यांची सर्जरी करण्यात आली. (Sadhguru Jaggi Vasudev Brain Surgery Reasons Symptoms And Solution Health Update)

मेंदूला सूज आणि ब्लिडींग का होते? (Causes of Brain Disease)

मेडीकल टु डे च्या रिपोर्टनुार मेंदूला सूज आणि ब्लिडींग होणं ही एक गंभीर स्थिती आहे. ज्याला इंट्राक्रायनियल हॅमरेज असंही म्हटलं जातं. ही स्थिती अशावेळी उद्भवते जेव्हा शरीरात तरल पदार्थ वाढतात आणि मेंदूच्या नसा फुटतात. मेंदूला सूज येणं आणि ब्लिडींगची अनेक कारणं असू शकतात. ज्यात हाय ब्लड प्रेशर, डोकेदुखी, रक्ताच्या गुठळ्या तयार होणं, ब्रेन ट्युमर यांचा समावेश आहे. जखम होणं, स्ट्रोक, सबड्युरल हेमेटोमा, एपिड्युरल हेपेटोमा यांमुळे मेंदूचे त्रास उद्भवतात. 

मेंदूला त्रास झाल्यास कोणती लक्षणं दिसून येतात (Symptoms Of Brain Disease)

मेंदूला सूज येणं, ब्लिडींग, डोकेदुखी, कमकुवतपणा, चक्कर येणं, बोलायला त्रास होणं, उलट्या, सुस्ती येणं, कंन्फ्यूजन, अशा अशी लक्षणं उद्भवतात.

यावर उपाय काय (Brain Disease Solution)

या वैद्यकिय स्थितीचे मूळ उपचार म्हणजे ब्लिडींग रोखणं, डोक्याची सूज कमी करणं आणि मेंदूच्या डॅमेज भागांना होणारं नुकसान कमी करणं हे आहे. औषधं आणि सर्जरी या दोघांच्या कॉम्बिनेशन्सने उपचार करता येतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सजग्गी वासुदेवआरोग्य