Join us
Daily Top 2 Weekly Top 5

डायबिटिस असेल तर आंबा खायचाच नाही, कोण म्हणतं? पाहा मधूमेह असेल तर आंबा खाण्याची योग्य पद्धत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2026 15:40 IST

Health Tips For Diabetic People: डायबिटिस असणाऱ्या बहुसंख्य लोकांना आंबा खावा की नाही हेच कळत नाही, म्हणूनच या काही खास टिप्स...(rules for diabetic people to eat mango)

आता लवकरच अक्षय्य तृतीया येत आहे. या दिवशीपासून बहुसंख्य मंडळी आंबा खायला सुरुवात करतात. वर्षभर ज्या फळाची वाट पाहात असताे, ते फळ यावेळी चाखायला मिळतं. त्यामुळे त्याचा आनंद वेगळाच असतो. पण डायबिटीस असणाऱ्यांचं दु:ख मात्र त्याहुनही वेगळं असतं. त्यांना आंबा खावा तर वाटत असतो, पण तो खाल्ल्यानंतर शुगर वाढेल काय याचं टेन्शनही असतं. त्यामुळे एकतर ते आंबा खाणं टाळतात, नाहीतर मग मनात गिल्ट तरी ठेवतात. हे दोन्ही टाळून मुक्त मनाने आंब्याचा आनंद घ्यायचा असेल तर पुढे सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवा आणि आंबा खायला सुरुवात करा...(proper method of eating mango for diabetic people)

 

मधुमेह असणाऱ्यांनी आंबा खाताना कोणती काळजी घ्यावी?

१. तज्ज्ञ असांगतात की मधुमेह असतानाही तुम्हाला आंब्याचा आनंद घ्यायचा असेल तर काही ठराविक नियम पाळायलाच हवेत. म्हणजेच आमरस पुरी, किंवा मँगो मिल्कशेक असे आंब्याचे पदार्थ न खाता दोन जेवणांच्या मधल्या वेळात भूक लागलेली असताना आंबा खाणे जास्त फायदेशीर ठरते.

केसांत माळलेलं फूल-गालावर खळी आणि सिल्कची सुंदर साडी.. आशाताईंचं हे रुप कसं कोण विसरेल?

२. किंवा तुम्ही व्यायाम करायला जाणार असाल तर त्याच्या आधी किंवा त्याच्या नंतर आंबा खा. कारण यामुळे आंब्यामधून शरीरात गेलेल्या कॅलरी लगेचच बर्न होण्यास मदत होते आणि मग आंबा खाऊन ना वजन वाढते, ना शुगर वाढते. 

 

३. आंबा चिरून किंवा चोखून खा. मिक्सरमधून केलेला आमरस खाणे टाळावे. त्याच्या नैसर्गिक स्वरुपातच तो खाल्ला जाईल याकडे लक्ष ठेवावे.

फक्त २ मिनिटांत करा कुरकुरीत गार्लिक ब्रेड, एकदम सोपी रेसिपी- चव अगदी रेस्टॉरंटसारखीच..

४. जर जेवणात तुम्हाला आमरस खायचाच असेल तर पोळी खाण्याचे प्रमाण कमी करा. भात खाणे पुर्णपणे टाळा आणि जेवणात कडधान्ये किंवा सलाड अवश्य घ्या. सुरुवातीला कडधान्ये, सलाड खाऊनच मग आमरस खायला सुरुवात करा.

५. रात्रीच्या वेळी आंबा खाणं टाळायला हवं. आंबा दिवसाच खा. तसेच मधुमेहींची शुगर खूप जास्त असेल तर आधी ती नॉर्मलला आणा आणि मग वर सांगितलेल्या पद्धतीने आंब्यांचा आनंद घ्या. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Diabetes and Mangoes: How to Enjoy Mangoes Safely with Diabetes

Web Summary : People with diabetes can enjoy mangoes by following specific guidelines. Consume mangoes between meals or before/after exercise to burn calories. Eat them in natural form, avoiding milkshakes. Reduce carbs in meals with mangoes, and avoid eating at night. Manage sugar levels first.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआंबामधुमेह