Join us

अरे बापरे! हाताने पटापट डास मारता पण हात धूतच नाही? ३ आजारांचा खूपच धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2025 15:59 IST

Health Tips: खूप लोकांना ही सवय असते. पण त्याचे किती घातक परिणाम होऊ शकतात ते पाहा...(risk of not washing hand after killing mosquito with palm)

ठळक मुद्दे हाताने डास मारल्यानंतर त्याच्या शरीरातलं रक्त आपल्या हाताला लागतं. बऱ्याचदा ते दिसत नाही. पण अगदी सुक्ष्म कणांच्या रुपात का असेना ते आपल्या हातावर असतंच.

पावसाळा, हिवाळा हे ऋतू म्हणजे सगळीकडे डासांचा सुळसुळाट. या दिवसांमध्ये डासांचे प्रमाण भयंकर वाढलेले असते. संध्याकाळच्या वेळी तर डास असह्य करतात. त्यामुळे मग आपण असंही पाहातो की कित्येक घरांमध्ये संध्याकाळ होत आली की दारं- खिडक्या लावून घेतल्या जातात. नाहीतर मग डास घरात शिरतात आणि घरात बसणंही अवघड करून टाकतात. अशावेळी समोर एखादा डास आला की दोन्ही हातांनी नेम धरून टाळी मारून डास मारण्याची सवय अनेकांना असते. त्यानंतर ९० टक्के लोक उठून हात धुण्याचे कष्ट घेत नाहीत. पण याचाच तुमच्या आरोग्यावर किती वाईट परिणाम होऊ शकतो ते पाहा.(risk of not washing hand after killing mosquito with palm)

 

हाताने पटापट डास मारता पण हात धूतच नाही?

हाताने डास मारल्यानंतर त्याच्या शरीरातलं रक्त आपल्या हाताला लागतं. बऱ्याचदा ते दिसत नाही. पण अगदी सुक्ष्म कणांच्या रुपात का असेना ते आपल्या हातावर असतंच. काही जणं तर अशा पद्धतीनेच कित्येक डास मारतात. खरंतर अशा पद्धतीने डास मारणं अतिशय चूक आहे.

आंघोळीच्या आधी मुलतानी मातीचा 'असा' उपाय करा, दिसाल तरुण-साबण नको की फेसवॉश नको

पण तरीही तुम्ही ही चूक करत असाल तर त्यानंतर हात तरी नक्की धुवा. कारण त्यामुळे कित्येक वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळू शकतं. तुमच्या हाताला बारीकशी जखम असेल तर डासाच्या रक्तामधले बॅक्टेरिया तुमुच्या शरीरात जाऊन फंगल, बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोकाही वाढतो.

 

एवढंच नाही तर त्यातून बरेचसे त्वचारोगही होऊ शकतात. त्वचेला खाज येणं, पुरळ उठणं, लाल डाग पडणं असा त्रासही होऊ शकते. हेच घाणेरडे हात जर अन्नपदार्थाला किंवा तुमच्या ओठांना, तोंडाला लागले तर पचनाशी संबंधित आजार होण्याचाही धोका असतोच.

दिवाळीचा फराळ जास्त झाल्याने अजूनही पोट बिघडलेलंच? ३ उपाय- गॅसेस, ॲसिडीटी कमी होईल

शिवाय डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, जिका व्हायरस अशा डासांशी संबंधित आजारांचा धोकाही असतोच. त्यामुळे हाताने डास मारणं बंद करा आणि डास पळवून लावण्यासाठी डासांची बॅट, उदबत्ती, क्रिम असे वेगवेगळे उपाय करा, असं तज्ज्ञ सांगतात. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सडेंग्यू