Join us
Daily Top 2 Weekly Top 5

शुगर वाढतेय-डायबिटीस होणार, तब्येत सांगते ओरडून पण..? पाहा कोणती लक्षणं ओळखली तर टळतो आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2026 18:47 IST

Rising blood sugar? your body Is warning you – spot these early symptoms of diabetes before It’s too late : शरीर देते संकेत. सांगते काय चुकतंय.

डायबिटीस (मधुमेह) हा आजकाल झपाट्याने वाढणारा आजार आहे. सुरुवातीला त्याची लक्षणे फार साधीच असतात, त्यामुळे अनेकदा तो उशिरा लक्षात येतो. मात्र शरीरात होणारे काही बदल ओळखले, तर डायबिटीस लवकर ओळखता येऊ शकतो आणि नियंत्रणात ठेवणं सोपं होतं. लहान वयातही लोकांना आजकाल हा त्रास होतो. (Rising Blood Sugar? your body Is warning You – Spot These Early Symptoms of Diabetes Before It’s Too Late)त्यामागे कारणे अनेक आहेत. वेळीच लक्षणे ओळखता आली तर आयुष्यभरासाठी गोळी पाठी लागत नाही. 

डायबिटीस झाल्यावर शरीरातील साखरेचं प्रमाण (ब्लड शुगर) वाढतं. यामुळे शरीराची ऊर्जा वापरण्याची पद्धत बदलते आणि त्याचा परिणाम अनेक गोष्टींवर दिसू लागतो. सर्वात सामान्य लक्षण म्हणजे वारंवार लघवी लागणे. शरीरातील अतिरिक्त साखर बाहेर टाकण्यासाठी किडनी अधिक काम करते, त्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते. त्यासोबतच सतत तहान लागणे हेही एक महत्त्वाचं लक्षण आहे. अचानक भूक वाढणे आणि खूप खाल्ल्यानंतरही काही वेळातच परत भूक लागणे हे ही डायबिटीसचे संकेत असू शकतात. कारण शरीराला योग्य ऊर्जा मिळत नाही. काही लोकांमध्ये वजन अचानक कमी होण्याचे लक्षण दिसते. जरी ते नेहमीसारखंच खात असले तरी. हे शरीरातील साखर योग्यरीत्या वापरली जात नसल्यामुळे होतं.

थकवा सतत जाणवणे, काम करण्याची ऊर्जा कमी होणे ही देखील महत्त्वाची लक्षणे आहेत. डोळ्यांची दृष्टी धूसर होणे, जखमा उशिरा भरुन येणे, वारंवार त्वचेचे इन्फेक्शन होणे हे बदलही दिसू शकतात. काही वेळा हात-पायांना मुंग्या येणे किंवा झिणझिण्या जाणवणेही डायबिटीसशी संबंधित असू शकतं. महिलांमध्ये वारंवार इन्फेक्शन, विशेषतः युरीन किंवा त्वचेचे संसर्ग, हे ही डायबिटीसचे संकेत असू शकतात. तसेच त्वचा कोरडी पडणे किंवा खाज येणे हे लक्षण दिसून येते.

डायबिटीस ओळखण्यासाठी फक्त लक्षणांवर अवलंबून राहणे योग्य नाही. रक्तातील साखरेची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. उपाशीपोटी (फास्टिंग) आणि जेवणानंतर (पोस्टप्रांडियल) शुगर टेस्ट केल्यास अचूक माहिती मिळते. एकूणच, शरीरात होणारे हे छोटे-छोटे बदल दुर्लक्षित करु नयेत. वेळेवर डायबिटीस ओळखून योग्य आहार, व्यायाम आणि उपचार घेतले, तर हा आजार नियंत्रणात ठेवणं पूर्णपणे शक्य आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Recognize Early Diabetes Symptoms: Your Body's Warnings Can Prevent the Disease

Web Summary : Diabetes is rapidly increasing. Early symptoms are subtle, but recognizing changes like frequent urination, increased thirst/hunger, and unexplained weight loss is crucial. Fatigue, blurred vision, slow-healing wounds, and infections can also indicate diabetes. Regular blood sugar tests are essential for timely diagnosis and management through diet, exercise, and treatment.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यमधुमेहहोम रेमेडीसोशल व्हायरल