भारतातील जवळपास १० कोटी लोक डायबिटीसचे शिकार आहे. बरेच लोक प्री डायबिटीक आहे. त्यांच्या शरीरात हा आजार आहे पण त्यांना अजून लक्षणं दिसलेली नाहीत. डायबिटीस झाल्यानंतर बाहेर कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत. (diabetes control Tips) डायबिटीसमुळे हार्टचे विकार, किडनीचे आजार, डोळ्याचे आजार तसेच त्वचेचे आजार होतात.
वेळीच डायबिटीससारख्या आजारांना रोखले तर गंभीर जोखीम टळू शकते. रिसर्चमध्ये दिसून आलं की नाश्ता करण्याच्या अर्धा तास आधी तुम्ही पिस्ता खाऊ शकता. यामुळे डायबिटीसचा धोका टळतो. यामुळे प्री डायबिटीक लोकांचा धोका टळतो. (Eat this food half an hour before meals For diabetes control)
डायबिटीस रिसर्च फाऊंडेशनच्या रिपोर्टनुसार ब्रेकफास्ट किंवा डिनरच्या अर्धा तास आधी ३० ग्राम पिस्ता खाल्ल्यानं प्री डायबेटीकची समस्या कमी होते. पिस्ता खाल्ल्यानं पोस्ट मील शुगर वाढत नाही. एवढेच नाही तर, नाश्त्यापूर्वी पिस्त्याचे नियमित सेवन केल्याने केवळ रक्तातील साखरच नाही तर ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाणही कमी होते, असेही या अभ्यासात आढळून आले आहे. एवढेच नाही तर पिस्त्याचे सेवन केल्याने कंबरेचा आकारही कमी होतो.
याचा सरळ अर्थ असा आहे की पिस्ता खाल्ल्याने रक्तातील साखर तर कमी होईलच पण कोलेस्ट्रॉलची पातळी आणि लठ्ठपणाही कमी होईल. अभ्यासात असे म्हटले गेले आहे की जर प्री-डायबिटीज व्यक्तीने पिस्त्याचे नियमित सेवन केले तर त्याची भूक कमी होते ज्यामुळे तो कमी खातो आणि शेवटी त्याचे वजन कमी होते. मधुमेह तज्ज्ञ डॉ. व्ही मोहन म्हणाले की, आपल्यापैकी बहुतांश भारतीय हे प्री-डायबेटिक आहेत. या संदर्भात, हा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे कारण यामुळे प्री-डायबेटिकची समस्या दूर होऊ शकते.
या अभ्यासात 30 ते 65 वयोगटातील व्यक्तींचा समावेश होता. यामध्ये अमेरिकेच्या टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचाही समावेश होता. हार्वर्ड टीएच चॅन स्कूलच्या पोषण विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. शिल्पा एन भूपतीराज यांनी सांगितले की, जेव्हा तुम्ही प्रथिने आणि निरोगी चरबीचे सेवन करता तेव्हा तुमचे कार्बोहायड्रेटचे सेवन आपोआप कमी होईल.
भारतातील बहुतेक लोक जास्त कर्बोदके खातात. या लोकांच्या आहारात पांढरा तांदूळ सर्वात जास्त असतो. पिस्त्याचे सेवन केले तर ते शरीरात प्रथिने भरते. प्रथिनाशिवाय पिस्त्यात हेल्दी फॅट्स आणि पॉलीफेनॉल देखील असतात ज्यामुळे अनेक रोगांचा धोका कमी होतो.
दुसरीकडे, भारतातील लोकांना जास्त कार्ब्स खाण्याची सवय झाली आहे. अशा स्थितीत जर तुम्ही पिस्त्याचे सेवन केले तर तुम्हाला भूक कमी लागेल आणि तुम्ही कमी खाल. त्यामुळे प्री-डायबेटिक असलेल्या लोकांसाठी पिस्ता खूप फायदेशीर ठरू शकतो आणि हा आजार कायमचा दूर होऊ शकता.