नवरात्रीत उपवासाच्या निमित्ताने जेवणात नेहमीपेक्षा वेगळे पदार्थ खाल्ले जातात. साबुदाणा वडे, भगर, शेंगदाण्याचे लाडू, बटाट्याची भाजी, राजगिरा लाडू असे पदार्थ अगदी ताव मारुन खाल्ले जातात. तळलेले, गोड आणि उष्ण पदार्थ सगळ्यांनाच आवडतात आणि ते मनापासून खाल्ले जातात. पण हे पदार्थ प्रमाणाबाहेर खाल्ले गेले तर नंतर पोट जड होणे, गॅसेस होणे, आम्लपित्त, जुलाब किंवा अपचन अशा तक्रारी वाढतात. (Remember these things while breaking the nine-day fast, your stomach will feel relaxed and there will be no digestive problems.)उपवास आनंदाने करण्यासाठी आणि आरोग्य सांभाळण्यासाठी काही साधे उपाय केले तर त्रास टाळता येतो. उपास सोडल्यावर काही सोपे उपाय करा म्हणजे आरोग्याला काही त्रास होणार नाही.
९ दिवस पोटाला वेगळे पदार्थ खायची सवय झाली असते. त्यामुळे पोटाला पुन्हा मार्गावर यायला जरा वेळ लागतो. त्यासाठी पाणी पिणे फायद्याचे ठरते. पचन सुरळीत राहण्यासाठी पाण्याचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. दिवसभरात वेळोवेळी कोमट पाणी प्यायल्याने अपचनाचा त्रास कमी होतो. उपवास सोडताना छान गोड सरबतं प्या. कोल्ड ड्रिंक्स किंवा कृत्रिम पेये टाळा आणि ताक, लिंबूपाणी किंवा साधं पाणी पिणं चांगलं ठरतं. ताक विशेषतः उष्ण पदार्थांमुळे होणारी जळजळ कमी करतं आणि पोटाला गारवा देते.
आहारात संतुलन ठेवणं महत्त्वाचं आहे. तळलेले आणि गोडाचे भरपूर पदार्थ आठवडाभर खाल्ले असतील तर पदार्थांसोबत फळं, उकडलेले बटाटे, राजगिरा भाकरी, शेंगदाण्याची आमटी असे हलके पदार्थही घ्यावेत. शक्यतो उपवासात जास्त तिखट मसाले वापरणं टाळावं. साजूक तुपाचा थोडा वापर केल्याने पचनक्रिया सोपी होते. केळी, गूळ, दुध असे पदार्थही शरीरात थंडावा राखायला मदत करतात.
मऊ भात खाणे चांगले ठरते. आरोग्यासाठी मऊ भात फार चांगला. तसेच तो पचायला सोपा असतो. त्यामुळे काही दिवस उपास केल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी अरबटचरबट आणि अति तिखट पदार्थ खाणे टाळा. त्याऐवजी साधे पदार्थ खा. पोटाला आराम मिळतो.
Web Summary : Breaking a Navratri fast? Reintroduce food gradually. Hydrate with water, avoid cold drinks. Eat balanced meals, including fruits and light dishes. Opt for soft rice and avoid spicy, oily food for easy digestion.
Web Summary : नवरात्रि व्रत खोलते समय, धीरे-धीरे भोजन शुरू करें। पानी से हाइड्रेट करें, कोल्ड ड्रिंक से बचें। फल और हल्के व्यंजन सहित संतुलित भोजन करें। नरम चावल चुनें और आसान पाचन के लिए मसालेदार, तैलीय भोजन से बचें।