दिवाळसण हा जसा दिव्यांचा उत्सव, आनंदोत्सव असतो, तसाच तो खवय्यांसाठी पर्वणीही असतो. कारण या दिवसात फराळाचे कित्येक वेगवेगळे पदार्थ केले जातात. लाडूंचे कित्येक प्रकार, शंकरपाळे, अनारसे, करंजी या गोड पदार्थांसोबतच शेव, चकली, चिवडा असे खमंग पदार्थही असतातच. आता हे सगळे पदार्थ जेव्हा समोर येतात, तेव्हा ते खाण्याचा मोह होतोच. त्यामुळे आपण ते खातो आणि नंतर मात्र कितीतरी दिवस आता वजन आणि शुगर वाढेल का याची काळजी करत बसतो. हे सगळं टाळायचं असेल तर डॉक्टर काय सांगतात ते एकदा पाहा आणि फराळाच्या पदार्थांचा मस्त आस्वाद घ्या..
दिवाळीत फराळ खाऊन वजन, शुगर वाढू नये म्हणून काय काळजी घ्यावी?
डॉक्टर सांगतात की ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांनी लाडू, करंजी, गुलाबजामुन, सोनपापड, पेढे असे साखरेचे प्रमाण जास्त असणारे पदार्थ टाळायला हवे.
Diwali Photo Shoot Ideas: सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी 'असे' काढा फोटो, मिळतील चिक्कार लाईक्स.
हे पदार्थ खायचे असतील तर अगदी मोजक्या प्रमाणात आणि ते ही जेवणाची सुरुवात करताना आधी खावेत.
चिवडा, शेव, विकतचे फरसाण या पदार्थांमध्ये तेल, तिखट, मीठ जास्त असते. हे पदार्थही थोडे कमी प्रमाणातच खायला हवे.
सणासुदीचे दिवस आहेत म्हणून व्यायाम करणे टाळू नका. कारण या दिवसांत पाहूण्यांनी घर भरलेलं असल्याने व्यायाम करण्याचा कंटाळा येतो. पण असं होऊ देऊ नका. व्यायाम टाळणं तर सोडाच पण नेहमीपेक्षा थोडा अधिक केला तरी चालेल.
धनत्रयोदशीला धने आणि गुळाच्या नैवेद्याचं एवढं महत्त्व का? ५ कारणं- हा प्रसाद खायला विसरू नका
मधुमेह असणाऱ्या ज्या लोकांची जेवणापुर्वीची शुगर १०० ते १३० आणि जेवणानंतरची शुगर १३० ते १७० यादरम्यान आहे म्हणजेच नियंत्रित आहे त्या लोकांनी शक्यतो घरी तयार केलेले फराळाचे पदार्थ खावे, असं डॉ. मयुरा काळे सांगतात.