बऱ्याच जणांना तोंड येण्याचा त्रास असतो. म्हणजेच त्यांच्या जिभेवर, तोंडाच्या आतल्या भागात फोड येत असतात. याचा इतका भयंकर त्रास असतो की कोणताही पदार्थ खाणं खूप अवघड होऊन जातं. काही व्हिटॅमिन्सची शरीरात कमतरता असेल तर असा त्रास वारंवार होऊ लागतो. पण म्हणून तो अंगावर काढणं मुळीच याेग्य नाही. असा त्रास जर तुम्हाला मागच्या काही महिन्यांपासून सतत होत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे (reasons of oral cancer). कारण जी गोष्ट तुम्हाला साधारण तोंड येणं वाटत आहे ती कदाचित तोंडाचा कॅन्सरही असू शकते (symptoms of oral cancer). तज्ज्ञांच्या मते आता ओरल कॅन्सरचे प्रमाणही खूप वाढले आहे.
सोहा अली खानचा एक नुकताच पॉडकास्ट झाला होता. तिच्या शोमध्ये डॉ. शेवंती लिमये यांनी माहिती दिली की भारतात ब्रेस्ट कॅन्सर प्रमाणेच ओरल कॅन्सरचे प्रमाणही खूप वाढले आहे. ताेंडात वारंवार फोड येणं, अल्सर होणं हे त्याचं एक महत्त्वाचं लक्षण आहे.
वजनाला मारा गोळी, सुटलेलं पोटही विसरा, ‘या’ २ गोष्टी जमत असतील तर समजा तुम्ही फिट आहात आणि सुंदरही
अर्थात तोंडात आलेला प्रत्येक फोड कॅन्सरचंच लक्षण आहे, असं नाही. पण आपण त्याबाबतीत सतर्क असणं खूप गरजेचं आहे. डॉक्टरांच्या मते भारतात दरवर्षी जवळपास दिड लाख लोकांना ओरल कॅन्सर होत आहे. यात पुरुषांचं प्रमाण खूप जास्त आहे. ओरल कॅन्सर नेमका का होतो, त्यामागची कारणं काय हे पाहूया..
ओरल कॅन्सर होण्यामागची कारणं
चुकीची जीवनशैली हे ओरल कॅन्सर होण्यामागचं एक मुख्य कारण आहे. ज्या लोकांना सुपारी, तंबाखू, सिगारेट, दारू असे पदार्थ खाण्याची सवय असते, त्यांना ओरल कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो.
Economic survey 2026 : घरोघर मुलं लठ्ठ, येत्या बजेटमध्ये कोल्ड ड्रिंक-जाम-सॉसवरचा जीएसटी वाढणार..?
याशिवाय दात, जीभ, हिरड्या यांच्या स्वच्छतेची व्यवस्थित काळजी न घेणाऱ्यांमध्येही ओरल कॅन्सर होताना दिसतो. तोंडात पांढरट चट्टे दिसत असतील, नेहमीच तोंड येत असेल, हिरड्या फुगल्यासारख्या झाल्या असतील, दातांच्या खाली वेदना होत असतील तर अशी कोणतीही लक्षणं जास्त दिवस अंगावर काढू नयेत, असा सल्ला डॉक्टर देतात.
Web Summary : Recurring mouth ulcers can be a sign of oral cancer, now increasingly common. Risk factors include tobacco use, poor oral hygiene. See a doctor if ulcers persist or you notice white patches, swelling, or pain.
Web Summary : बार-बार मुंह में छाले आना ओरल कैंसर का संकेत हो सकता है, जो अब तेजी से बढ़ रहा है। तंबाकू का सेवन और खराब मौखिक स्वच्छता जोखिम कारक हैं। छाले बने रहने, सफेद धब्बे, सूजन या दर्द होने पर डॉक्टर से मिलें।