Join us

कोलेस्टेरॉल कमी करतो अन् पिंपल्स दूर करतो कच्चा लसूण, जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 10:15 IST

Raw Garlic Benefits :लसणामुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. यात अनेक औषधी गुण असल्याने आयुर्वेदातही याला खूप महत्व आहे.

Raw Garlic Benefits : लसणाचा वापर रोज वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टेस्ट वाढवण्यासाठी केला जातो. सोबतच लसणाचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात हेही तुम्ही ऐकलं असेल. लसूण शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासही मदत करतो. मात्र, लसणाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे लसणामुळे नसांमधील ब्लॉकेज मोकळे करण्याची देखील क्षमता असते.

लसणामुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. यात अनेक औषधी गुण असल्याने आयुर्वेदातही याला खूप महत्व आहे. अशात अनेक एक्सपर्ट उपाशीपोटी कच्चा लसूण खाण्याचा सल्ला देतात. कच्चा लसूण खाल्ल्याने शरीराला याचे फायदे डबल मिळतात. हृदयरोग असलेल्यांसाठी तर कच्चा लसूण वरदानच मानला जातो.

कसा खावा लसूण?

लसणाची टेस्ट तिखट असते. त्यामुळे जास्तीत जास्त लोक लसूण थेट न खाता वेगवेगळ्या भाज्या पदार्थांमध्ये टाकून खातात. मात्र, सकाळी उपाशीपोटी लसणाची एक कच्ची कळी चावून खाल्ली आणि वरून पाणी प्यायलं तर फायदा अधिक मिळतो. अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते.

ब्लॉकेजचा धोका कमी

रोज लसणाची एक कच्ची कळी खाल्ल्याने शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होतं. यात एलिसिन नावाचं एक तत्व असतं, जे हवेच्या संपर्कात आल्यावर सल्फर बेस्ड तत्व बनतं. हे कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतं. तसेच नसांमध्ये ब्लॉकेज होण्याचा धोकाही कमी करतं. 

डागही होतील दूर

एलिसिनमुळे अनेक बॅक्टेरिया नष्ट होतात.  यात पिंपल्ससाठी जबाबदार बॅक्टेरियांचाही समावेश आहे. डॉ. निशांत गुप्ता यांच्यानुसार, लसूण बॉडी डिटॉक्स करण्यासाठीही फायदेशीर ठरतो. कच्चा लसूण नियमितपणे खाल्ल्यास शरीरातील अनेक विषारी तत्व बाहेर पडतात. ज्यामुळे त्वचेवर पिंपल्स, पुरळ येत नाही आणि डागही दूर होतात.

पचन सुधारेल

लसणामुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. याने पोटातील जठराग्नि वाढते. ज्यामुळे अन्न लवकर आणि चांगल्या पद्धतीने पचतं. सोबतच यातील फायबर पोट साफ करण्यासही मदत करतं.

कच्चा लसूण खाल्ल्याने पोटासंबंधी अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात. कारण यातील तत्वांमुळे पोटातील बॅड बॅक्टेरिया नष्ट होतात आणि गुड बॅक्टेरियांचं प्रमाण वाढतं.

टॅग्स : हृदयरोगहृदयविकाराचा झटकाहेल्थ टिप्स