Join us

रामदेवबाबा सांगतात, पोट साफ होत नसेल तर करा गुलाबाच्या पाकळ्यांचा ‘हा’ सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2025 16:07 IST

Ramdev Baba Suggests Use Of Rose Petals To Get Rid Of Constipation: कॉन्स्टीपेशन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास नेहमीच होत असेल तर रामदेव बाबा यांनी सांगितलेला हा एक सोपा उपाय करून पाहा..(Ramdev baba suggests home remedies for constipation)

ठळक मुद्दे या त्रासासाठी वारंवार औषधं घेणंही बरं नाही. त्यामुळेच रामदेव बाबा यांनी सांगितलेला गुलाब पाकळ्यांचा हा एक सोपा उपाय करा.

बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक आजार डोकं वर काढत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टीपेशन. खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती, व्यायाम किंवा शारिरीक हालचालींचा अभाव, एकाच जागी तासंतास बसून काम करणे, रात्रीचं जागरण, सकाळी उशिरा उठणे या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या पचनसंस्थेवर अगदी नकळतपणे होत असतो. यामुळे मग हल्ली बऱ्याच जणांना कॉन्स्टीपेशनचा त्रास होतो. कितीतरी वेळ टॉयलेटमध्ये बसूनही पोट साफ होतच नाही. या त्रासासाठी वारंवार औषधं घेणंही बरं नाही. त्यामुळेच रामदेव बाबा यांनी सांगितलेला गुलाब पाकळ्यांचा हा एक सोपा उपाय करा (Ramdev baba suggests use of rose petals to get rid of constipation).. काही मिनिटांतच पोट अगदी पुर्णपणे साफ होत जाईल.(Ramdev baba suggests home remedies for constipation)

 

पोट साफ होण्यासाठी रामदेव बाबा सांगतात खास उपाय

बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी कोणता घरगुती उपाय करता येऊ शकतो, याविषयीची माहिती रामदेव बाबा यांनी इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

केस, त्वचा तर छान होईलच, तब्येतही सुधारेल- १ पैसाही खर्च न करता १ मिनिटांत करा जादुई उपाय

यामध्ये ते सांगतात की एक वेगळ्या प्रकारचं गुलकंद तयार करून तुम्ही नियमितपणे खाल्लं तरी तुमच्या पचनाच्या संदर्भातल्या अनेक तक्रारी काही दिवसांतच दूर होऊ शकतात. 

यासाठी गावरान गुलाबाच्या काही पाकळ्या घ्या. त्या पाकळ्यांमध्ये एक चमचा खडीसाखर, १ टीस्पून मिरेपूड, १ टेबलस्पून मध आणि १ वेलची घाला. हे सगळं मिश्रण एका खलबत्त्यामध्ये घालून अगदी बारीक कुटून घ्या..

 

हे तयार झालेलं घरगुती गुलकंद तुम्ही असंही खाऊ शकता किंवा मग काचेच्या बरणीमध्ये घालून काही काळ उन्हात ठेवूनही खाऊ शकता.

'हा' गंभीर आजार झाल्याने समंथा प्रभूनं जंकफूडच्या जाहिरातींना दिला नकार, म्हणाली करोडे रुपये....

हा उपाय केल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊन पोट साफ होण्यास तर मदत होईलच पण ज्यांना नेहमीच ॲसिडीटीचा त्रास असतो, त्यांचाही त्रास खूप कमी होईल. 

उन्हाळ्यात अनेक जणांना उष्णतेचा त्रास होतो. त्यामुळे शरीराला थंडावा देण्यासाठी उन्हाळ्यात वरील पद्धतीने घरच्याघरी तयार केलेले गुलकंद खाणेही जास्त फायदेशीर ठरते. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडीघरगुती उपाय