सध्या बदललेल्या जीवनशैलीमुळे रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर, मधुमेह असे त्रास असणाऱ्या व्यक्ती घरोघरी आहेत. ज्या घरात असे कोणतेही त्रास नसणाऱ्या व्यक्ती आहेत, ते घर अगदी तुरळक झाले आहे. ब्लड प्रेशर, शुगर असे त्रास असतील तर सगळ्यात आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि त्यानुसार औषधं आणि आहार घेणे सगळ्यात जास्त गरजेचे आहे. पण त्यासोबतच डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तुम्ही रामदेव बाबा सांगत आहेत तो एक खास उपायही करून पाहू शकता. हा उपाय अतिशय सोपा आहे आणि ब्लड प्रेशर, मधुमेह असे त्रास नियंत्रित ठेवण्यासोबतच इतरही अनेक शारिरीक व्याधी कमी करण्यासाठीही तो उपाय फायदेशीर ठरू शकतो.(Health benefits of bilva patra for controlling blood pressure and sugar)
ब्लड प्रेशर, मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी कोणता उपाय करावा?
रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी बेलाची पाने अतिशय गुणकारी ठरतात असं रामदेव बाबा सांगतात. आपल्याकडे श्रावण महिन्यात बेलाच्या पानाचे खूप महत्त्व आहे.
लग्नसराईत गळ्यात शोभतो ठसठशीत चंद्रहार! घरंदाज मराठमोळा अलंकार-रुप चारचौघीत दिसतं देखणं
आरोग्याच्या दृष्टीने बेलाचे पान गुणकारी आहे, म्हणूनच तर त्याला आध्यात्मिक दृष्ट्याही खूप महत्त्व आहे. रामदेव बाबा सांगतात की ७ ते ८ बेलाची पाने स्वच्छ धुवून घ्या आणि ती थोडं पाणी घालून मिक्सरमधून बारीक फिरवून घ्या. ५ ते ६ मिनिटांनी बेलाच्या पानाचा रस प्या. हा उपाय केल्यास शरीराला खूप वेगवेगळे फायदे होतात. ते नेमके कोणते ते पाहूया.
बेलाच्या पानाचे आरोग्याला होणारे फायदे
१. वाढलेला रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
२. रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण कमी होण्यास उपयुक्त. त्यामुळे मधुमेहींसाठी विशेष फायदेशीर.
पावसाळ्यासाठी चप्पल घ्यायची? बघा फक्त १५० रुपयांत पावसाळी पण फॅशनेबल स्टायलिश फूटवेअर
३. वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा रोग बरे करण्यासाठी फायदेशीर ठरते.
४. शरीरातले विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकून शरीर आतून शुद्ध होण्यास मदत होते.
५. जुलाब थांबण्यासाठीही बेलाचे पान, बेलाचे फळ उपयुक्त ठरते.