Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मुलांचा हात भाजला- चटका बसला? पटकन करा ४ उपाय - आग होईल कमी

मुलांचा हात भाजला- चटका बसला? पटकन करा ४ उपाय - आग होईल कमी

child burn remedies : hand burn treatment: first aid for burns: चटका लागल्यानंतर कोणत्या गोष्टी करायला हव्या आणि टाळायला हव्या जाणून घेऊया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2025 11:33 IST2025-08-25T11:31:25+5:302025-08-25T11:33:45+5:30

child burn remedies : hand burn treatment: first aid for burns: चटका लागल्यानंतर कोणत्या गोष्टी करायला हव्या आणि टाळायला हव्या जाणून घेऊया.

quick home remedies for child hand burn how to reduce burning sensation after burn naturally | मुलांचा हात भाजला- चटका बसला? पटकन करा ४ उपाय - आग होईल कमी

मुलांचा हात भाजला- चटका बसला? पटकन करा ४ उपाय - आग होईल कमी

स्वयंपाकघरात काम करताना अनेकदा आपल्या लहान-सहान चुकांमुळे मुलांच्या हाताला भाजण्याची शक्यता अधिक असते.(child burn remedies) लहान मुले खूप खेळकर असतात, सहज उत्सुकतेपोटी गरम पाणी, दूध, स्वयंपाकघरातील भांडी, गॅस किंवा इलेक्ट्रिक वस्तूंना हात लावतात.(hand burn treatment) त्यामुळे भाजण्याची किंवा चटका लागण्याची ही गोष्ट सामान्य वाटत असली तरी कधी कधी ही जखम गंभीर होते.(first aid for burns) भाजल्यामुळे त्वचेला जखम होते, वेदना होतात आणि संसर्गाचा धोका वाढतो.(burn relief home remedies) पालक अशा वेळी खूप घाबरतात किंवा काही घरगुती उपाय करतात. ज्यामुळे जखम बरी होण्याऐवजी ती मोठ्या प्रमाणात वाढते. (kids burn care)
चटका बसल्यानंतर अनेकदा फोड येतात. या फोडांमध्ये पाणी देखील साठते. फोड फुटल्यानंतर त्यातील पाणी निघून जळलेली त्वचा निघून जाते, त्यावेळी आणखी वेदना होतात. काही चटक्यांचे डाग निघून जातात. पण मात्र चटका लागल्यानंतर कोणत्या गोष्टी करायला हव्या आणि टाळायला हव्या जाणून घेऊया. 

कोथिंबीर लवकर सडते - पाने पिवळी पडतात? सोपी ट्रिक, आठवडाभर फ्रीजशिवाय राहिल ताजी-हिरवीगार

1. मुलांना भाजल्यानंतर त्या जागेवर थंड पाणी किंवा बर्फ १० ते १५ मिनिटे हातावर हळूहळू चोळा. त्यामुळे जळजळ कमी होऊन त्वचेला आराम मिळतो. बर्फ हा जखमेच्या आजूबाजूला चोळावा. थेट जखमेवर लावल्यास जखम आणखी वाढते. 

2. जखमेला हलक्या हाताने कोरड्या किंवा स्वच्छ कापडाने झाका. यामुळे धूळ किंवा इतर गोष्टी जखमेत जाणार नाही, ज्यामुळे इन्फेक्शन वाढणार नाही. जखमेवर टूथपेस्ट, तेल, तूप किंवा हळद असे काहीही लावू नका, यामुळे जखम अधिक वाढते. 

3. वेदना कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषधे देऊ नका. फक्त मुलाला शांत ठेवा. भाजलेली जखम खूप मोठी असेल, त्वचा फोडासारखी सुटली असेल तर डॉक्टरांकडे जा. फोड येणे चांगले असते, वाईट नाही. भाजल्यानंतर फोड फोडू नका. फोड फोडले की जखम लवकर बरी होत नाही. कणिक आणि नीळ कोरफड जेल लावू नका. यामुळे संसर्ग वाढतो. 

4. भाजल्यानंतर शरीरावर असणारे दागिने, बेल्ट्स अथवा कोणत्याही घट्ट वस्तू काढून टाका. त्या जखमेला हवेशीर जागेवर ठेवा. भाजल्यानंतर अनेकदा मध देखील लावले जाते. मध लावल्यामुळे जखम बरी होते. आणि डाग देखील पडत नाही. 

Web Title: quick home remedies for child hand burn how to reduce burning sensation after burn naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.