आपल्यापैकी अनेकांना पित्ताचा त्रास होतो. पित्तामुळे शरीरावर लाल रंगाचे जाडसर आणि खाज येणारे चट्टे येतात. हा त्रास खूप वेदनादायक आणि त्रासदायक असतो. पित्तामुळे (fastest way to cure pitta) अंगावर येणारे जाडसर चट्टे आपल्याला फारच हैराण करतात. अंगावर येणाऱ्या चट्ट्यांमुळे लालसर रॅशेज, खाज सुटणे किंवा त्वचेला सतत इरिटेशन (home remedies for pitta allergy) होणे यांसारख्या इतरही समस्या सतावतात. अनेकदा पित्त (pitta dosha skin allergy treatment) वाढल्यामुळे लगेच डॉक्टरकडे जाणे शक्य नसते, अशावेळी काही सोपे आणि घरगुती उपायही आपल्याला तात्काळ आराम देऊ शकतात. काहीवेळा अचानकपणे हे पित्ताचे चट्टे त्वचेवर येतात आणि प्रचंड खाज व जळजळ सुरु होते, हा त्रास लगेच थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय पाहूयात(ayurvedic remedy for pitta).
घरगुती उपाय त्वचेला थंडावा देऊन हे चट्टे कमी करण्यास मदत करतात. जर तुमच्यासोबतही असे वारंवार होत असेल, तर हे काही खास उपाय उपयुक्त ठरू शकतात. औषधांबरोबरच काही सोपे घरगुती उपाय केल्यास हे पित्ताचे चट्टे कमी होऊन आपल्याला अराम मिळू शकतो. जिवा आयुर्वेदचे सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर प्रताप चौहान यांनी NDTV ला दिलेल्या खास मुलाखतीत, त्वचेवरील पित्ताचे चट्टे कमी करण्यासाठी खास उपाय सांगितले आहेत.
१. असे का होते?
आयुर्वेदाचार्य सांगतात की, त्वचेवर पित्त उठण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की :-
१. कोणत्याही औषधाची, अन्नपदार्थांची, धुळीची, प्रदूषणाची किंवा रसायनांची ॲलर्जी.
२. काहीजणांना हवामान बदलल्यावर ही समस्या अधिक त्रास देते.
३. पचनसंस्थेतील बिघाडामुळे असे होऊ शकते.
४. या व्यतिरिक्त, ताणतणाव आणि अपुऱ्या झोपेमुळे शरीराचे संतुलन बिघडते. यामुळेही पित्त उठू शकते.
तब्येत म्हणजे काडी, काही केल्या वजन वाढत नाही? ५ प्रकारे खा खजूर, सुधारणारच तब्येत...
२. त्वचेवरील पित्ताचे चट्टे घालवण्यासाठी उपाय...
१. डॉ. प्रताप चौहान सांगतात की, पित्त उठल्यावर सर्वात आधी खाजवणे टाळावे, अन्यथा त्वचेवरील चट्टे आणखी वाढू शकतात.
२. थंड पाण्याची पट्टी या चट्ट्यांवर ठेवल्याने आराम मिळतो.
३. तुम्ही शरीरावर कडुलिंब किंवा तुळशीची पाने वाटून लावू शकता. असे केल्याने खाज आणि जळजळ कमी होते.
४. याव्यतिरिक्त, आहाराकडे विशेष लक्ष द्या. हलके, सहज पचणारे अन्न खा, जसे की- दलिया, खिचडी, फळे.
५. थंड गुणधर्म असलेले पदार्थ, जसे की काकडी आणि नारळपाणी देखील फायदेशीर ठरतात.
३. डॉक्टरांकडे कधी जायला हवे?
डॉ. प्रताप चौहान सांगतात की, जर पित्ताचा त्रास वारंवार होत असेल किंवा त्यासोबत श्वास घेण्यास त्रास होणे, चेहऱ्यावर सूज येणे आणि चक्कर येणे यांसारख्या समस्या असतील, तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा. हे गंभीर ॲलर्जीचे लक्षण असू शकते. पित्ताच्या समस्येला हलक्यात घेऊ नका. हे शरीर आपल्याला आतून काहीतरी असंतुलन होत असल्याचा संकेत देत आहे. थोडीशी खबरदारी, योग्य आहार आणि लाईफस्टाईलमध्ये काही सुधारणा केल्यास ही समस्या लवकर बरी होऊ शकते.