Join us

उशीलाही असते एक्सपायरी डेट ? पाहा उशी बदलण्याची योग्य वेळ - नाहीतर द्याल अनेक आजारांना आमंत्रण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2025 15:10 IST

expiry pillows can affect your skin sleep & lungs know right time to change them : Pillow Expiry Date : उशीची एक्स्पायरी डेट ओळखण्यासाठी 'सोप्या' टिप्स, वेळीच बदला उशी - वाढतील आरोग्याच्या अनेक तक्रारी...

आपल्या नेहमीच्या वापरातील काही वस्तूंना एक्सपायरी डेट असते. आपण अनेकदा अन्नपदार्थ, औषधे किंवा मेकअप तसेच अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्सची एक्स्पायरी डेट तपासून पहातो. आपण रोज झोपताना वापरत असलेली उशी आपल्याला आरामदायी झोप देण्यासाठी किती महत्त्वाची असते हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, पण तुम्हाला माहिती आहे का, उशीला देखील एक्स्पायरी डेट असते? होय, दीर्घकाळ वापरल्याने उशीतील कापूस, फोम किंवा फायबर खराब होऊन उशी मळकी व अतिशय घाण होते(signs your pillow needs replacing)

उशीचा आकार, मऊपणा आणि स्वच्छता नसल्याने अशा उशीवर झोपल्याने मानदुखी, पाठीचा त्रास, ऍलर्जी, पिंपल्स किंवा स्किन इंफेक्शनसारखे प्रॉब्लेम्सही होऊ शकतात. वर्षानुवर्षे एकाच उशीचा वापर केल्यास, तिच्यात घाम, डेड स्किन सेल्स, तेलकट घटक, धूळ आणि जंतू यांचा थर जमा होतो. हे सर्व घटक बॅक्टेरियाची वाढ करतात, ज्यामुळे अनेक समस्या होऊ शकतात. यासाठीच, वेळोवेळी उशीची स्वच्छता राखणे आणि तिची एक्स्पायरी डेट  ओळखणे अत्यंत गरजेचे असते. तुमची आवडती उशी कधी बदलायची हे ओळखणे खूप गरजेचे असते. उशीची एक्स्पायरी डेट कधी झाली आहे हे ओळखण्यासाठी सोप्या टिप्स पाहूयात. 

उशी ठरेल आयोग्यासाठी धोकादायक! 

वर्षानुवर्षे आपली तीच एक आवडती उशी वापरल्याने तुम्हाला आरोग्याच्या अनेक त्रासदायक समस्या होऊ शकतात. उशी ही बेडरूममधील अशी वस्तू आहे, जिच्या संपर्कात आपला चेहरा आणि त्वचा दररोज सुमारे ८ ते १० तास असतात. डॉक्टर मनन व्होरा (Dr. Manan Vora) यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, जेव्हा आपण झोपलेले असता, तेव्हा चेहऱ्यावरील डेड स्किन, लाळ, त्वचेतील नैसर्गिक तेल आणि धुळीचे कण उशीवर एकत्रित गोळा होतात. 

दीर्घकाळ अशी उशी वापरल्याने या सर्वांचा थर उशीवर जमा होत जातो. अशा परिस्थितीत, जर उशी वेळेवर स्वच्छ केली नाही किंवा बदलली नाही, तर यावर जमा झालेली धूळ आणि घाण पिंपल्स, ॲलर्जी आणि जळजळ यांसारख्या समस्या होऊ शकतात. इतकेच नाही तर, यामुळे फुफ्फुसांना देखील नुकसान पोहोचू शकते.

ब्रेकजदा उशा पॉलीयुरेथेन फोम सारख्या कृत्रिम साहित्यापासून तयार करतात. कालांतराने या उशीतून हानिकारक कार्बनिक संयुगे बाहेर पडतात ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडते. जर एखादी व्यक्ती दीर्घकाळ गलिच्छ उशीच्या संपर्कात राहिली, तर तिला फुफ्फुसांमध्ये घातक संक्रमण होण्याचा धोका असतो.

डायबिटीस असेल तर गव्हाच्या नको 'या' पिठाच्या चपात्या खा! शुगर वाढण्याचं टेंशनच विसरा, जेवा पोटभर...

मुलांना लागली 'W' सिटिंगमध्ये बसण्याची सवय ? ३ योगासन - ही सवय मोडून मुलांची बसण्याची स्थिती सुधारेल... 

उशीची एक्स्पायरी डेट संपली आहे हे नेमके कसे ओळखायचे ?

 डॉक्टर मनन व्होरा (Dr. Manan Vora) यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे, उशीची 'एक्स्पायरी डेट' ही तुम्ही वापरत असलेल्या उशीच्या प्रकारावर अवलंबून असते. म्हणजेच, पॉलिस्टर, फेदर, फोम पासून बनवलेल्या उशांची एक्स्पायरी डेट वेगवेगळी असू शकते. पॉलिएस्टर ६ ते २४ महिने, फेदर १ ते ३ वर्षे, मेमरी फोम २ ते ३ वर्षे, लेटेक्स ३ ते ४ वर्षे, बकवीट ३ ते ५ वर्षे  अशा प्रकारे उशीच्या वेगवेगळ्या फोमनुसार तिची एक्स्पायरी डेट देखील वेगळी असते.

English
हिंदी सारांश
Web Title : Pillow expiration: Know when to replace for health, avoid diseases.

Web Summary : Pillows have expiration dates! Old pillows accumulate dust, dead skin, and bacteria, causing allergies, acne, and respiratory issues. Replace pillows every 6 months to 5 years depending on the material for better health.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स