Join us
Daily Top 2 Weekly Top 5

हेअर डाय केल्यानं वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, अभ्यासाचा दावा-महिलांच्या आरोग्याशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2026 18:09 IST

Health Tips About Breast Cancer: हेअर डाय किंवा हेअर स्ट्रेटनिंग करणे आणि ब्रेस्ट कॅन्सर यांचा नेमका एकमेकांशी काय संबंध असतो

ठळक मुद्दे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांच्या अहवालानुसार त्यांनी एकूण ४६ हजार महिलांचा अभ्यास केला. त्या अभ्यासातून असं समोर आलं की....

हल्ली कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या खूप वाढली आहे. बदललेली जीवनशैली, आहारात झालेला बदल यासोबतच काही अनुवंशिक गोष्टीही यासाठी जबाबदार आहेत. पण अगदी शाळा- काॅलेजमध्ये जाण्याच्या वयातच एखाद्याचे केस पांढरे झाले तर त्याचा त्याच्या आत्मविश्वासावर खूप परिणाम होतो. त्यामुळे डोक्यात पांढरे केस दिसायला लागताच काही जण लगेचच हेअर डाय किंवा हेअर कलर वापरायला सुरुवात करतात. कारण केस रंगविण्याचा तो अगदी सोपा आणि स्वस्त मार्ग आहे. त्यामुळे वर्षांनुवर्षें याचा पद्धतीने केमिकलयुक्त रंग वापरून केस रंगविले जातात आणि नंतर मात्र त्याचा आरोग्यावर खूप वाईट परिणाम दिसून यायला सुरुवात होते. याविषयीचाच एक अभ्यास National Institutes of Health या संस्थेने केला आहे.

 

हेअर डाय, हेअर स्ट्रेटनिंगनमुळे वाढतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका?

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांच्या अहवालानुसार त्यांनी एकूण ४६ हजार महिलांचा अभ्यास केला. त्या अभ्यासातून असं समोर आलं की ज्या महिला वारंवार परमनंट हेअर डायचा वापर करतात त्यांच्यामध्ये इतर महिलांच्या तुलनेत ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका ९ टक्क्यांनी जास्त असतो.

साधा ढोकळा नेहमीच खाता; आता मटार ढोकळा खाऊन पाहा.. थंडीच्या मौसमातला खमंग पदार्थ

आफ्रिकन अमेरिकन महिलांमध्ये याचा धोका जास्त आहे. दर ५ ते ६ आठवड्यातून एकदा परमनंट हेअर कलर करणाऱ्या महिलांमध्ये तर हा धोका ६० टक्क्यांपेक्षा जास्त असतो. याशिवाय वेगवेगळे केमिकल्स वापरून ज्या महिला वारंवार हेअर स्ट्रेटनिंग करतात त्यांनाही ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका ३० टक्क्यांपेक्षा जास्त असतो. 

 

पण याविषयी अनेक तज्ज्ञ असं सांगतात की त्या उत्पादनांमध्ये असणाऱ्या केमिकल्समुळेच थेट कॅन्सर होतो, असं अजून सिद्ध झालेलं नाही. पण त्या प्रोडक्ट्समधलेच काही घटक मात्र नकळतपणे तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. शेवटी ते एक प्रकारचे केमिकलच आहे.

महिलांनो सावधान! खूप वेगाने वाढत आहेत सर्व्हायकल कॅन्सरचे रुग्ण- 'या' बाबतीत राहा सतर्क 

त्यामुळे त्याचा जेवढा मर्यादित वापर करता येईल, तेवढा करावा. पण कोणत्याही निष्कर्षावर येण्यापुर्वी यावर अजून संशोधन होण्याची गरज असल्याचं अभ्यासकांचं मत आहे. तर याचा परिणाम महिलांच्याच आरोग्यावर होतो का, पुरुषांच्या नाही का असा प्रश्नही मागील कित्येक वर्षांपासून नियमितपणे हेअर डाय वापरणाऱ्या काही वाचकांची विचारला आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Hair dye increases breast cancer risk, claims study: Women's health at risk.

Web Summary : Study links permanent hair dye and straighteners to increased breast cancer risk, especially for African American women. Experts advise moderation, citing potential chemical impacts while calling for more research.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सकेसांची काळजीमहिलाकर्करोगस्तनाचा कर्करोग