मखाना हा पदार्थ आता सध्या खूप ट्रेण्डिंग झाला आहे. साधारण ५ ते ६ वर्षांपुर्वीसुद्धा मखान्यांना एवढी लोकप्रियता मिळालेली नव्हती. पण आता मात्र सुपरफूड म्हणून मखाने ओळखले जातात. एवढंच नाही तर पंतप्रधान मोंदीनीही एकदा त्यांच्या भाषणातून नियमितपणे मखाना खाण्याचे महत्त्व समजावून सांगितले होते. उपवासालाही चालणारा मखाना खरोखरच अतिशय आरोग्यदायी आहे. मखान्यांमध्ये प्रोटीन्स, चांगले फॅट्स योग्य प्रमाणात असतात. कॅलरी खूप कमी असतात. याशिवाय त्यातून कॅल्शियमही भरपूर प्रमाणात मिळते. संध्याकाळी स्नॅक्समध्ये किंवा सकाळी नाश्त्यामध्ये तर अनेक जण आवर्जून मखाना खातातच (who should avoid eating makhana?).. पण असं सगळं असलं तरी काही लोकांनी मात्र मखाना खाणं टाळायला हवं (Why Makhanas Aren't The Best Snack For Everyone?) किंवा ते खूप कमी प्रमाणात खायला हवे. याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी दिली आहे.(side effects of eating makhana)
मखाना खाणं कोणी टाळायला हवं?
मखाना खाणं कोणत्या व्यक्तींसाठी त्रासदायक ठरू शकतं, याविषयीची आहारतज्ज्ञ श्वेता शाह यांनी दिलेली माहिती एनडीटीव्हीने प्रकाशित केली आहे. त्यानुसार...
रोपांना फुलंच येईना? फक्त १ चमचा चहा पावडरचा उपाय करा- ८ दिवसांत येतील भरपूर फुलं
१. ज्या लोकांना कॉन्स्टीपेशनचा त्रास असतो, अशा व्यक्तींनी मखाना खाणं टाळायला हवं. कारण मखान्यांमध्ये असे काही गुणधर्म असतात ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास वाढू शकतो. अशा लोकांनी मखाना खायचेच असतील तर ते खूप कमी प्रमाणात खावे.
२. मखान्यांमध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे बऱ्याचदा ते पचायला वेळ लागत असल्याने पचनक्रियेदरम्यान फर्मेंट होऊन ॲसिडीटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ज्या लोकांना ॲसिडीटीचा त्रास असतो, त्यांनी मखाना खाणं टाळायला हवं.
उन्हामुळे खूप टॅनिंग झालं? किचनमधले 'हे' पदार्थ एकत्र करून चेहऱ्यावर चोळा- त्वचा उजळून चमकेल
३. कफ प्रकृती असणाऱ्या लोकांनीही मखाना खाणं टाळायला हवं. कारण त्यामुळे त्यांचा कफ वाढू शकतो.
४. वरील प्रकारचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी मखाना खाऊ नये, असं आहारतज्ज्ञ सांगतात. पण जर तुम्हाला मखाना खूपच आवडत असतील आणि ते खाण्याची इच्छा तीव्र असेल तर मखाना खीर, तुपात भाजलेले मखाना या पद्धतीने ते अगदी मर्यादित प्रमाणात खावे.