जसजसं वय वाढत जात तशा आरोग्याच्या अनेक लहान - मोठ्या समस्या त्रास देतात. वाढत्या वयोमानानुसार, सगळ्यात कॉमन असलेली एक समस्या म्हणजे गुडघेदुखी. गुडघेदुखी (Ayurveda Potli Massage for Knee Pain) ही वयोमानानुसार होणारी सामान्य समस्या असली, तरी हल्लीच्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे ही समस्या तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणावर दिसून येते. सततचं उभं राहणं, चुकीची बैठक पद्धत, अपुरी झोप, पोषणतत्त्वांची कमतरता किंवा सांधेदुखीचे आजार ही गुडघेदुखीचे मुख्य कारण ठरू शकतात( onion and mustard Potli massage is effective for knee pain).
बरेचदा आपण ऐकतो की गुडघेदुखीवर अनेक गोळ्या, औषध, क्रीम्स लावून पाहिल्या तरी देखील काहीच फरक होत नाही. अशा परिस्थितीत, वेदनाशामक औषधांवर अवलंबून न राहता, घरगुती आणि नैसर्गिक उपायांची मदत घेणं केव्हाही फायदेशीर ठरतं. गुडघेदुखीवर घरगुती उपाय म्हणजे कांदा आणि मोहरीच्या दाण्यांचा पोटली मसाज. कांदा आणि मोहरी (Ayurvedic Home Remedies for Knee Pain) हे दोन्ही उष्ण पदार्थ असून ते शरीरातील रक्ताभिसरण वाढवून सूज आणि वेदना कमी करण्यात मदत करतात. या घरगुती उपायामुळे संधीवात, गुडघ्यांचा जडपणा आणि गुडघेदुखी यांसारख्या समस्यांवर प्रभावी ठरते. गुडघेदुखीवर कांदा आणि मोहरी दाण्यांचा पोटली मसाज कसा करायचा ते पाहूयात(home remedy for reducing joint pain and knee pain).
गुडघेदुखीवर कांदा आणि मोहरी दाण्यांचा पोटली मसाज...
गुडघेदुखीवर हा घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त १ कांदा, वाटीभर मोहरी, ३ टेबलस्पून मोहरीचे तेल आणि एक कॉटनचा रुमाल इतक्या गोष्टींची गरज लागणार आहे. गुडघेदुखीवरील हा सोपा घरगुती उपाय इंस्टाग्रामवरील shikhashrivastavainsta या अकाउंटवरुन शेअर करण्यांत आला आहे.
नेमकं करायचं काय ?
सर्वातआधी एक कॉटनचा कपडा अंथरुन या कपड्याचा बरोबर मधोमध वाटीभर मोहरी ओतून घ्यावी. त्यानंतर या मोहरी दाण्यांच्या बरोबर मधोमध एक कांदा सालीसकट ठेवावा. आता रुमालाची चारही टोक मध्यभागी एकत्रित घेऊन एक मसाज पोटली तयार करून घ्यावी. आता गुडघ्यावर हलकेच गरम केलेले मोहरीचे तेल लावून हलक्या हाताने चोळून मसाज करून घ्यावा. त्यानंतर गॅसच्या मध्यम आचेवर पॅन ठेवून त्यावर ही तयार पोटली ठेवून स्वतःला सोसवेल इतकी गरम करून घ्यावी. त्यानंतर या गरम पोटलीने गुडघा शेकून घ्यावा.
उन्हाळ्यात चुकूनही खाऊ नयेत असे ७ पदार्थ! डिहायड्रेशनची वाढते- थकवा आणि चक्कर येऊन पडाल आजारी...
कांदा आणि मोहरीच्या पोटली मसाजाचे फायदे...
१. कांद्यात सल्फर फार मोठ्या प्रमाणात असतो जो संधिवातासारख्या वेदनांवर फायदेशीर ठरतो. मोहरी उष्ण असल्यामुळे ती स्नायूंमधील कडकपणा आणि वेदना कमी करते.
२. गरम पोटलीने मसाज केल्यास त्या भागातील रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे शरीराला नैसर्गिकरित्या सूज व वेदना कमी करण्यासाठी आवश्यक पोषण आणि ऑक्सिजन मिळतो.
३. कांदा आणि मोहरी दोन्हीमध्ये अँटीइंफ्लामेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे गुडघ्यांभोवती आलेली सूज कमी होते.
दातांच्या समस्यांवर इवलीशी लसूण पाकळी ठरते प्रभावी उपाय! दात दिसतील मोत्यासारखे पांढरेशुभ्र...
लक्षात ठेवा...
१. मसाज करताना पोटली खूप गरम करणे टाळा, त्वचेला भाजू शकते.
२. हा उपाय दिवसातून एकदा किंवा आवश्यकतेनुसार नियमित केल्यास चांगला फायदा होतो.