Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > तूप फक्त चवीसाठी नाही, तर स्त्रियांच्या 'या' ६ समस्यांवर गुणकारी! चमचाभर तूप 'असं' खाणं ठरेल अमृत...

तूप फक्त चवीसाठी नाही, तर स्त्रियांच्या 'या' ६ समस्यांवर गुणकारी! चमचाभर तूप 'असं' खाणं ठरेल अमृत...

one spoon of ghee benefits for women : ghee for women health benefits : स्त्रियांच्या ६ मुख्य समस्यांवर तुपाचा वापर कसा करावा, याचे काही सोपे आणि घरगुती उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2026 13:40 IST2026-03-21T13:40:00+5:302026-03-21T13:40:01+5:30

one spoon of ghee benefits for women : ghee for women health benefits : स्त्रियांच्या ६ मुख्य समस्यांवर तुपाचा वापर कसा करावा, याचे काही सोपे आणि घरगुती उपाय...

one spoon of ghee benefits for women ghee for women health benefits | तूप फक्त चवीसाठी नाही, तर स्त्रियांच्या 'या' ६ समस्यांवर गुणकारी! चमचाभर तूप 'असं' खाणं ठरेल अमृत...

तूप फक्त चवीसाठी नाही, तर स्त्रियांच्या 'या' ६ समस्यांवर गुणकारी! चमचाभर तूप 'असं' खाणं ठरेल अमृत...

भारतीय स्वयंपाकघरात 'शुद्ध साजूक तूप' हे हमखास काही विशिष्ट पदार्थांमध्ये वापरले जाते. साजूक तूप हे केवळ अन्नपदार्थांची चव वाढवण्यासाठी वापरले जाते असा आपला समज आहे. परंतु आयुर्वेदानुसार तूप हे केवळ एक खाद्यपदार्थ नसून ते शरीराला आतून आणि बाहेरून 'हील' करणारे एक शक्तिशाली औषध आहे. विशेषतः महिलांच्या धावपळीच्या आयुष्यात उद्भवणाऱ्या अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांवर तुपाचा वापर कमालीचा फायदेशीर ठरू शकतो. रोजच्या आहारात योग्य प्रमाणात तुपाचा समावेश केल्याने शरीराला पोषण मिळतं आणि अनेक आरोग्य समस्या दूर होण्यास मदत होते. योग्य पद्धतीने तुपाचा वापर केल्यास पोट साफ होण्यापासून त्वचेची चमक वाढवण्यापर्यंत आणि शांत झोप लागण्यापासून रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यापर्यंत अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात. पण, नक्की कोणत्या समस्येवर तूप कसं वापरायचं? याबद्दल अनेकजणींना माहिती नसते. महिलांना वारंवार सहन कराव्या लागणाऱ्या काही कॉमन समस्या अशा आहेत, ज्यावर तुपाचा योग्य पद्धतीने वापर केल्यास आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात(one spoon of ghee benefits for women).

आपल्या आजी-आजोबांच्या काळात तुपाला 'अमृत' मानलं जायचं, पण आजच्या डाएटच्या जगात आपण तुपापासून लांब पळतोय. मात्र, प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. रमिता कौर यांच्या मते, तूप केवळ कॅलरीज वाढवत नाही, तर ते महिलांच्या शरीरातील काही समस्यांवर गुणकारी मानलं जातं...डॉ. रमिता कौर यांनी महिलांच्या ६ मुख्य समस्यांवर तुपाचा वापर (ghee for women health benefits) कसा करावा, याचे काही सोपे आणि घरगुती उपाय सांगितले आहेत...

१. ब्लोटिंग (पोट फुगणे), निस्तेज त्वचा आणि अनियमित पाळी :- जर तुम्ही सतत जाणवणारी ब्लोटिंग (पोटात गॅस होणे किंवा फुगल्यासारखे वाटणे), त्वचेचा कमी झालेला तजेला किंवा अनियमित मासिक पाळी यामुळे हैराण असाल, तर तुपाचा हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. तुपामुळे पचनसंस्था सुरळीत होते, ज्यामुळे गॅस आणि ब्लोटिंगची समस्या कमी होते. तुपातील हेल्दी फॅट्स रक्ताभिसरण सुधारतात, ज्यामुळे निस्तेज पडलेल्या त्वचेवर नैसर्गिक उजळपणा येतो. महिलांच्या शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी तूप मदत करते, ज्याचा सकारात्मक परिणाम मासिक पाळीवर होतो. यासाठी, दररोज रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करावा. थोडेसे शुद्ध साजूक तूप कोमट करून घ्या. हे कोमट तूप तुमच्या नाभीमध्ये (बेंबीमध्ये) हळुवारपणे लावा. तूप लावल्यानंतर नाभीच्या आजूबाजूला हलक्या हाताने मसाज केल्यास ते शरीरात व्यवस्थित शोषले जाते.

तिशी ओलांडताच भारतीय स्त्री-पुरुष होऊ लागतात जाड, सुटतं पोट- लठ्ठ होण्याची पाहा २ कारणं...

२. मायग्रेन, सायनस आणि ब्रेन फॉग, स्मरणशक्तीची कमतरता :- जर तुम्हाला वारंवार होणारी डोकेदुखी, सायनसचा त्रास किंवा मानसिक थकवा जाणवत असेल, तर साजूक तूप तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. तूप नाकाचा मार्ग स्वच्छ करण्यास आणि डोक्याचा जडपणा कमी करण्यास मदत करते. कोमट तूप नाकात टाकल्यामुळे सायनसमुळे होणारा अडथळा दूर होतो. यामुळे मेंदूला शांत करते आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करते. मायग्रेनमुळे होणाऱ्या तीव्र वेदना कमी करण्यासाठी हा एक जुना आणि खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय आहे. डॉ. रमिता कौर यांनी सुचवलेली ही पद्धत अत्यंत सोपी आहे दररोज सकाळी हा उपाय करावा. शुद्ध साजूक तूप थोडे कोमट करून घ्या. कोमट तुपाचा प्रत्येकी १ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये घाला. 

डाएट करतानाही बिंधास्त खा पुऱ्या, तमन्न भाटियाचे फिटनेस कोच सांगतात-पुरी खाण्याचं तंत्र...

३. निद्रानाश (Insomnia), चिंता (Anxiety) आणि भेगाळलेल्या टाचा :- जर तुम्हाला शांत झोप लागत नसेल, सतत तणाव किंवा अँक्झायटी जाणवत असेल किंवा फाटलेल्या टाचांच्या समस्येने हैराण असाल, तर तुपाचा हा वापर अत्यंत  गुणकारी ठरतो. यामुळे शरीर रिलॅक्स होते, चांगली झोप घेण्यास मदत करते आणि टाचांना मऊ बनवते. रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट तुपाने तळपायांना ५ ते १० मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. यामुळे शरीरातील तणाव कमी होऊन शांत झोप लागते आणि फाटलेल्या टाचा मऊ होतात.

४. तोंडाची दुर्गंधी, पिवळे दात आणि शरीरातील विषारी घटक :- ओरल हेल्थसाठी तुपाचा वापर अत्यंत गुणकारी मानला जातो. साजूक तुपाच्या वापराने तोंड स्वच्छ ठेवण्यास, दुर्गंधी कमी करण्यास आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते. यावर उपाय म्हणून आयुर्वेदात 'ऑइल पुलिंग' (Oil Pulling) चा खास पर्याय सांगितला आहे. १ चमचा कोमट तूप तोंडात घ्या आणि ५ ते १० मिनिटे ते तोंडात सगळीकडे फिरवा (चुळा भरल्याप्रमाणे). यामुळे दात पांढरे शुभ्र होतात, हिरड्या मजबूत होतात आणि तोंडाला येणारी दुर्गंधी कायमची कमी होते. 

उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होतेय? शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी खा १० पदार्थ - उन्हाळा होईल सुखकर... 

५. कोरडा खोकला, टॉन्सिल्स आणि आवाजातील जडपणा :- घशात होणारी खवखव, कोरडा खोकला किंवा आवाज बसल्याची समस्या असेल, तर तुपाचा वापर अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. हे घशाला नैसर्गिकरीत्या मॉइश्चराइझ करते आणि तेथील जळजळ कमी करण्यास मदत करते. जेव्हा घशात त्रास जाणवेल किंवा रात्री झोपण्यापूर्वी १ चमचा शुद्ध साजूक तूप कोमट करून हळूहळू गिळावे. (तूप खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका). कोमट दुधात अर्धा चमचा तूप टाकून प्यायल्यानेही टॉन्सिल्समध्ये आराम मिळतो. यासोबतच, कोमट तूप घशावर (बाहेरून) हलक्या हाताने मसाज करत लावा. यामुळे घशातील जळजळ कमी होते आणि आवाजात सुधारणा होण्यास मदत होते.

६. रोगप्रतिकारशक्ती, बद्धकोष्ठता आणि सांधेदुखी :- जर तुमची रोगप्रतिकारशक्ती वारंवार कमी होत असेल, तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा सांधेदुखीचा त्रास होत असेल, तर १ चमचा शुद्ध साजूक तूप तुमच्यासाठी औषधासारखे काम करू शकते. हे पचन सुधारण्यास, शरीराला ताकद देण्यास आणि सांध्यांमधील सूज कमी करण्यास मदत करते. तूप सांध्यांमध्ये वंगणासारखे काम करते, ज्यामुळे सांधेदुखीमध्ये आराम मिळतो. सोबतच आतड्यांमधील घाण साफ करण्यास मदत करते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या मुळापासून संपते.तुपामुळे शरीराची ऊर्जा टिकून राहते आणि आजारांशी लढण्याची शक्ती मिळते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी १ चमचा कोमट शुद्ध साजूक तूप थेट घ्या किंवा कोमट पाण्यात/दूधात मिसळून प्या.

Web Title : घी: सिर्फ स्वाद नहीं, महिलाओं की समस्याओं का इलाज भी।

Web Summary : घी, स्वाद से परे, महिलाओं के स्वास्थ्य में सहायक है। यह पेट फूलना, त्वचा, मासिक धर्म, सिरदर्द, नींद, पाचन और प्रतिरक्षा में मदद करता है।

Web Title : Ghee: Not just for taste, a remedy for women's problems.

Web Summary : Ghee, beyond taste, aids women's health. It helps with bloating, skin, periods, headaches, sleep, digestion, and immunity when consumed correctly.