Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ऑफिसची खुर्ची झाली दुश्मन - प्रत्येकाच्या मागे पाठीचं दुखणं, ‘ही’ १ चूक जन्मभर पडेल महागात...

ऑफिसची खुर्ची झाली दुश्मन - प्रत्येकाच्या मागे पाठीचं दुखणं, ‘ही’ १ चूक जन्मभर पडेल महागात...

office chair and sitting posture back pain : back pain due to office chair : office chair back pain prevention : ऑफिसमधील खुर्चीवर चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे मागे लागेल पाठीचं दुखणं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2026 17:00 IST2026-02-24T17:00:00+5:302026-02-24T17:00:02+5:30

office chair and sitting posture back pain : back pain due to office chair : office chair back pain prevention : ऑफिसमधील खुर्चीवर चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे मागे लागेल पाठीचं दुखणं...

office chair and sitting posture back pain back pain due to office chair office chair back pain prevention | ऑफिसची खुर्ची झाली दुश्मन - प्रत्येकाच्या मागे पाठीचं दुखणं, ‘ही’ १ चूक जन्मभर पडेल महागात...

ऑफिसची खुर्ची झाली दुश्मन - प्रत्येकाच्या मागे पाठीचं दुखणं, ‘ही’ १ चूक जन्मभर पडेल महागात...

सध्याच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये 'डेस्क जॉब' हा आपल्या डेली रुटीनचा अविभाज्य भागच बनला आहे. ऑफिसमध्ये ८ ते ९ तास सतत लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरसमोर बसून काम करणे ही आता अगदीच कॉमन गोष्ट झाली आहे. मात्र, हे तासंतास एकाच जागी बसणे आपल्या आरोग्यासाठी, विशेषतः पाठीसाठी किती घातक ठरू शकते, याचा आपण कधी विचारच करत नाही... अनेकांना वाटते की कामाचा ताण किंवा वाढते वय यामुळे पाठदुखी सुरू झाली आहे. पण खरं हे आहे की, ऑफिसची खुर्ची आणि त्यावर बसण्याची चुकीची पद्धत हे या दुखण्याचे मुख्य कारण आहे. चुकीच्या पद्धतीने खुर्चीवर तासंतास पुढच्या बाजूला झुकून किंवा खांदे पाडून बसल्यामुळे पाठीच्या कण्यावर आणि स्नायूंवर अतिरिक्त ताण येतो(office chair and sitting posture back pain).

सुरुवातीला किरकोळ वाटणारी ही पाठदुखी पुढे (back pain due to office chair) जाऊन स्लिप डिस्क किंवा क्रॉनिक बॅक पेनसारख्या गंभीर आजारांचे रूप घेऊ शकते. अशा परिस्थितीत, ऑफिसची खुर्ची पाठदुखीला कशी कारणीभूत ठरते? आणि यातून स्वतःचा बचाव कसा करावा? याबद्दल नारायणा (office chair back pain prevention) हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक्स तज्ज्ञ डॉ. हेमंत बन्सल यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत नेमकं काय सांगितलं आहे ते पाहूयात... 

ऑफिसची खुर्ची खरोखरच पाठदुखीला कारणीभूत ठरते का?

डॉ. हेमंत बन्सल यांच्या मते, ऑफिसमधील खुर्चीवर दीर्घकाळ बसल्यामुळे पाठदुखीची समस्या होणे ही आता एक कॉमन समस्या झाली आहे. यामध्ये खुर्चीची रचना अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. जर खुर्चीमध्ये कंबरेच्या खालच्या भागाला (Lower Back) योग्य आधार नसेल, तर पाठीच्या कण्याचा नैसर्गिक आकार बिघडतो, ज्यामुळे वेदना सुरू होतात. खूप उंच किंवा खूप सखल खुर्ची, कडक सीट किंवा बॅकरेस्ट नसलेली खुर्ची शरीराचे संतुलन बिघडवते. जर तुमचे पाय जमिनीवर नीट टेकले जात नसतील किंवा गुडघे कंबरेपेक्षा खूप वर किंवा खाली राहत असतील, तर त्याचा थेट ताण पाठीवर पडतो. थोडक्यात सांगायचे तर, केवळ खुर्चीवर बसणेच नाही तर 'चुकीच्या खुर्चीवर' बसणे हे पाठदुखी किंवा पाठीच्या इतर दुखण्याचे मोठे कारण ठरु शकते. 

अचानक नाही येत हार्ट अ‍ॅटॅक! शरीर आधीच देत ५ सायलेंट सिग्नल - शरीरातील छोटे बदलही ठरू शकतात हार्ट अ‍ॅटॅकच मोठं कारण...

बिनसाखरेचा चहा बिंधास्त प्यायल्यानेही होते आहे आरोग्याचे नुकसान, डॉक्टर सांगतात, हे एक चुकतं कारण...

खुर्चीचा आकार योग्य असूनही होऊ शकतात वेदना... 

डॉ. हेमंत बन्सल सांगतात की, तुमची खुर्ची कितीही चांगली का असेना, तासनतास एकाच स्थितीत (Position) बसून राहणे तुमच्या कंबरेसाठी हानिकारक ठरू शकते. आपल्या शरीराला दर ३० ते ४० मिनिटांनी हालचालीची गरज असते.

सतत एकाच जागी बसून राहिल्यामुळे स्नायूंमध्ये ताण निर्माण होऊ शकतो आणि रक्तभिसरण (Blood Circulation) मंदावू शकते, ज्यामुळे वेदना आणि थकवा या दोन्ही समस्या वाढू शकतात. म्हणूनच, फक्त योग्य खुर्ची असून चालणार नाही, तर बसण्याची योग्य पद्धत आणि ठराविक अंतराने ब्रेक घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

ऑफिसमध्ये पाठदुखीपासून बचाव करण्यासाठी खास टिप्स... 

डॉ. हेमंत बन्सल यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नुसार, स्नायूंची ताकद आणि हालचाल करण्याची क्षमता सुधारण्यासाठी शारीरिक हालचाली आणि एक्सरसाईज करणे आवश्यक आहे. यासाठी 'फिजिकल थेरपी' अत्यंत फायदेशीर ठरते, जी पाठदुखीपासून आराम मिळवून देण्यास मदत करू शकते. 

१. एकाच स्थितीत तासंतास बसू नका. दर ४० मिनिटांनी खुर्चीवरून उठा, थोडे चाला आणि शरीराला स्ट्रेच करा. बसताना पाठ सरळ ठेवा आणि खांदे झुकवू नका. 

२. कंबरेच्या खालच्या भागाला आधार देण्यासाठी गरज पडल्यास लहान उशीचा वापर करा. 

३. तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपची स्क्रीन डोळ्यांच्या लेव्हलला असावी, जेणेकरून मान सतत खाली झुकवावी लागणार नाही. 

४. स्नायू मजबूत करण्यासाठी नियमितपणे पाठीचे हलके व्यायाम करा. डॉक्टरांच्या सल्ल्याने स्ट्रेचिंगवर भर द्या. 

५. बसताना दोन्ही पाय जमिनीवर समांतर आणि सपाट ठेवा. पाय एकमेकांवर टाकून (Cross-legged) बसणे टाळा, कारण यामुळे रक्ताभिसरणात अडथळा येऊ शकतो.

ऑफिसमधील काम टाळणे शक्य नसले तरी, आपल्या सवयींमध्ये थोडे बदल करून आपण पाठदुखीला नक्कीच दूर ठेवू शकतो. एक चांगली खुर्ची आणि बसण्याची योग्य पद्धत हे केवळ आरामासाठी नसून तुमच्या आरोग्यासाठी केलेली एक मोठी गुंतवणूक आहे.

Web Title : ऑफिस की कुर्सी: दुश्मन! गलत मुद्रा से पीठ दर्द, बचाव के उपाय।

Web Summary : ऑफिस की कुर्सी पर लंबे समय तक बैठने से पीठ दर्द हो सकता है। विशेषज्ञ सहायक कुर्सियों का उपयोग करने, सही मुद्रा बनाए रखने, नियमित ब्रेक लेने, स्ट्रेचिंग करने और उचित स्क्रीन ऊंचाई सुनिश्चित करने की सलाह देते हैं ताकि पीठ की पुरानी समस्याओं को रोका जा सके।

Web Title : Office chair: Enemy! Bad posture causes back pain, prevention tips.

Web Summary : Prolonged sitting in office chairs can lead to back pain. Experts advise using supportive chairs, maintaining good posture, taking regular breaks, stretching, and ensuring proper screen height to prevent chronic back problems.