Belly Fat : पोटावर वाढत असलेली आज एक मोठी समस्या आहे. चुकीची लाइफस्टाईल, शरीराची हालचाल न करणे आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे जगभरातील लोक पोटावर वाढत चाललेल्या चरबीमुळे चिंतेत आहेत. पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न देखील करतात, पण सगळ्यांनाच फायदा मिळतो असं नाही. तुमच्याही पोटावरील चरबी कमी होत नसेल तर ही मोठी चिंतेची बाब ठरू शकते.
अलिकडेच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, बेली फॅटमुळे सोरायसिस (psoriasis) सारख्या त्वचेच्या गंभीर आजाराचा धोका वाढू शकतो. शोधात आणखी काय सांगितलं हे सविस्तर जाणून घेऊ.
काय सांगतो रिसर्च?
हा रिसर्च लंडनच्या किंग्स कॉलेजच्या वैज्ञानिकांनी केला. ज्यात यूकेतील ३.३ लाखांपेक्षा जास्त लोकांच्या आकडेवारीचं विश्लेषण करण्यात आलं. यातील ९ हजारांपेक्षा जास्त लोक सोरायसिनने पीडित होते. रिसर्चमध्ये शरीरातील २५ वेगवेगळ्या चरबीसंबंधी मापांना बघण्यात आलं. या रिसर्चमधून असा निष्कर्ष समोर आला की, कंबरेजवळ जमा झालेल्या चरबीमुळे सोरायसिसचा धोका अधिक वाढतो.
काय आहे एक्सपर्टचा सल्ला?
या रिसर्चचे मुख्य लेखक डॉ. रवि रमेसुर सांगतात की, "हे समजून घेणं फार महत्वाचं आहे की, चरबी किती आहे, यापेक्षा ती कुठे आहे यानंही सोरायसिसचा धोका प्रभावित होतो. खासकरून कंबरेच्या आजूबाजूला जमा चरबीच्या या आजाराचा खोलवर संबंध आहे. त्यामुळे उपचार आणि याला आळा घालण्याच्या रणनितीमध्ये बदल करण्याची गरज आहे".
महिलांना जास्त धोका
एक चिंताजनक बाब म्हणजे महिलांमध्ये पोटावरील चरबी आणि सोरायसिस यात संबंध आढळून आला आहे. अभ्यासकांचं मत आहे की, यामागे अशी काही जैविक कारणं असू शकतात, जी आतापर्यंत पूर्णपणे समजू शकली नाहीत. यावर आणखी रिसर्चची गरज आहे.
सगळ्यांवर लागू होतो का हा नियम?
हा रिसर्च सध्या ब्रिटनमधील गोऱ्या लोकांवर आधारित आहे. त्यामुळे यातील निष्कर्ष जगातील इतर लोकांवरही लागू करणं सध्याच शक्य नाही. येणाऱ्या काळात वेगवेगळे जाती-समूह आणि विविध लोकांवर रिसर्च करण्याची गरज आहे.
या रिसर्चमधून एक बाब तर स्पष्ट आहे की, पोटावरील चरबी केवळ फिगर किंवा ड्रेस साइजचा विषय नाहीये. तर चरबी तुमच्या शरीरात वाढत असलेली सूज आणि आजारांचा सेकंतही असू शकतो. त्यामुळे आता शरीरातील चरबी कमी करण्याकडे गंभीरतेने बघितलं पाहिजे.