महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं ही आपल्याकडे अजूनही खूप सामान्य गोष्ट आहे. घर, मुलं, जबाबदार्या, कामं या सगळ्यांत स्वतःसाठी वेळ काढणं अनेकदा मागे पडतं. 'मला काय होतंय?' असं म्हणून लहानसहान त्रास दुर्लक्षित केले जातात. (Never Skip Routine checkups , every women should know this )पण हीच सवय पुढे मोठ्या आजारांना आमंत्रण देऊ शकते. त्यामुळे महिलांनी रुटीन चेकअप करणं महत्त्वाचं आहे.
आपल्या शरीरात होणारे बदल सुरुवातीला फारसे जाणवत नाहीत. पण योग्य वेळी तपासणी केली तर आजार लवकर ओळखता येतात आणि त्यावर उपचार करणं सोपं होतं. उदाहरणार्थ, हार्मोनल बदल, रक्तातील कमतरता, थायरॉईड समस्या किंवा मधुमेह यांसारख्या गोष्टी सुरुवातीला शांतपणे वाढत राहतात. त्यामुळे काही वाटत नसलं तरी वर्षातून किमान एकदा पूर्ण शरीर तपासणी करणं गरजेचं आहे. महिलांनी कोणत्या तपासण्या करायला हव्यात याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. सर्वात आधी नियमित ब्लड टेस्ट करून हिमोग्लोबिन, साखर आणि कोलेस्टेरॉल तपासणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर थायरॉईड फंक्शन टेस्ट ही खूप आवश्यक आहे, कारण महिलांमध्ये थायरॉईडचे प्रमाण जास्त दिसून येते.
स्त्रियांसाठी खास असलेल्या तपासण्यांमध्ये पॅप स्मीअर टेस्ट अत्यंत महत्त्वाची आहे. ही तपासणी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका लवकर ओळखण्यासाठी केली जाते. ३० वर्षांनंतर ही टेस्ट डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित करायला हवी. तसेच स्तनांमध्ये कोणताही बदल जाणवत असल्यास मॅमोग्राफी किंवा सोनोग्राफी करून घेणं आवश्यक आहे. हाडांची झीज टाळण्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटामिन डी पातळी तपासणंही गरजेचं आहे, विशेषतः ३५-४० नंतर. अनेक महिलांमध्ये हाडं कमकुवत होण्याची समस्या दिसून येते, पण ती वेळेवर लक्षात येत नाही.
रुटीन चेकअप किती वेळा करावा याबद्दल बोलायचं झालं, तर २०-३० वयोगटातील महिलांनी दर वर्षी बेसिक तपासण्या कराव्यात. ३० नंतर काही स्पेशल टेस्ट्स (जसे पॅप स्मीअर) सुरू कराव्यात आणि ४० नंतर अधिक नियमितपणे तपासण्या करणं आवश्यक होतं. जर कुटुंबात काही आजारांचा इतिहास असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासण्यांची वारंवारता वाढवावी. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या आरोग्याचा ट्रॅक ठेवणं. आजकाल मोबाइलमध्ये नोट्स, अॅप्स किंवा साध्या डायरीतही आपण आपले रिपोर्ट्स, लक्षणं, पाळीचं रुटीन, वजन, ब्लड प्रेशर यांची नोंद ठेवू शकतो. यामुळे कोणताही बदल लगेच लक्षात येतो आणि डॉक्टरांनाही योग्य माहिती देता येते.
Web Summary : Women often neglect health, inviting serious ailments. Routine checkups are crucial for early disease detection and treatment. Regular blood tests, thyroid, Pap smears, and mammograms are vital, especially after 30. Track health changes for timely medical advice.
Web Summary : महिलाएं अक्सर स्वास्थ्य को नजरअंदाज करती हैं, जिससे गंभीर बीमारियां होती हैं। बीमारियों का शीघ्र पता लगाने और इलाज के लिए नियमित जांच महत्वपूर्ण है। नियमित रक्त परीक्षण, थायरॉयड, पैप स्मीयर और मैमोग्राम महत्वपूर्ण हैं, खासकर 30 के बाद। समय पर चिकित्सा सलाह के लिए स्वास्थ्य में बदलावों पर नज़र रखें।