Join us

रात्री झोपण्यापूर्वी मुलांना दूध देत असाल तर आताच थांबा; करू नका ही चूक, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 13:03 IST

रात्री लहान मुलांना दूध देणं हे त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. रात्री का दूध पिऊ नये हे जाणून घेऊया...

रात्री झोपण्यापूर्वी पालक आपल्या मुलांना दूध प्यायला देतात. रात्री दूध देणं मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं असं पालकांना वाटतं. जर तुम्हीही रात्री असा विचार करून आपल्या मुलांना दूध देत असाल तर आताच सावधगिरी बाळगा. रात्री लहान मुलांना दूध देणं हे त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. रात्री का दूध पिऊ नये हे जाणून घेऊया...

जर तुमचं मुलाचं जर दोन वर्षांपेक्षा जास्त वय असेल आणि त्याला सतत खोकला आणि सर्दी होत असेल तर रात्री त्याला दूध देणं टाळा. जर तुमच्या मुलाला यासोबतच बद्धकोष्ठता आणि थकवा येत असेल, तर ही मिल्क बिस्किट सिंड्रोमची लक्षणं असू शकतात. तुम्हाला या सिंड्रोमबद्दल माहिती असायला हवी. जर तुम्ही रात्री बाळाला गोड दूध दिलं तर त्यामुळे सर्दी आणि खोकला होऊ शकतो. तसेच अ‍ॅसिडिटी होऊ शकते.

मिल्क बिस्किट सिंड्रोम म्हणजे काय?

मिल्क बिस्किट सिंड्रोम हा आजार नाही, मात्र रात्री मुलाला दूध आणि स्नॅक्स दिल्याने रिफ्लक्सची समस्या उद्भवू शकते. यासोबतच मुलाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. ही कोणतीही ऍलर्जी किंवा संसर्ग नाही तर तुम्ही तुमच्या मुलाला जे खायला देत आहात त्यामुळे होत आहे.

मुलांना दूध का देऊ नये?

रिपोर्टनुसार, दुधात साखर असते जी रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते आणि मुलामध्ये हायपरएक्टिव्हिटी निर्माण होऊ शकते. ज्यामुळे मुलाला रात्री झोपायला त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की रात्री झोपण्यापूर्वी बाळाला दूध पाजल्याने त्याला शांत झोप येईल, तर तुम्ही चुकीचे आहात. यामुळे वारंवार झोपमोड होऊ शकते.

वजन वाढणार नाही

रात्री झोपण्यापूर्वी बाळाला दूध दिलं तर त्याचं वजन वाढेल असा अनेकांचा गैरसमज असतो. पण ते तसं नाही. रात्री बाळाला दूध दिल्याने त्याचं वजन वाढणार नाही.

बॉडी डिटॉक्सिफिकेशन होत नाही

तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, जर तुम्ही तुमच्या मुलाला दूध दिलं आणि नंतर रात्री झोपवलं तर त्याचं शरीर नॅचरली डिटॉक्सिफाईड होऊ शकत नाही. डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेत समस्या येते. यामुळे, जर तुम्ही लहान मुलांना रात्री दूध देत असाल तर ते आताच बंद करा.

ज्या मुलांना खोकला आणि सर्दीचा जास्त त्रास होतो त्यांनी रात्री दूध देणं टाळाच. जर तुमच्या मुलालाही अशी समस्या असेल तर काही दिवस रात्री त्याला दूध देऊ नका. तुमच्या मुलाच्या आरोग्यात तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल. त्याला सर्दी आणि खोकल्याचा त्रास हळूहळू कमी होऊ लागेल. 

दूध देण्याची योग्य वेळ कोणती?

लहान मुलांना दूध देण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी नाश्त्याच्या वेळी. नाश्त्यासोबत दूध द्यावं. सकाळी दूध प्यायल्याने बाळ दिवसभर एक्टिव्ह राहतं आणि दूध सहज पचतं. दूध पचवण्यास कोणतीही अडचण येत नाही. जर तुमचं मूल शाळेत जात असेल तर सकाळी शाळेत जाताना तुमच्या मुलाला दूध पाजावं. यामुळे सकाळी त्याचं पोटही भरलेलं राहील.

टॅग्स : हेल्थ टिप्सदूध