Join us
Daily Top 2 Weekly Top 5

कडुलिंबाचा पाला म्हणजे आरोग्यासाठी वरदान ! पचन - त्वचा- केसांसह उन्हाळ्यात तब्येतीसाठी खास उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2026 15:55 IST

Neem leaves are a boon to health! Special remedies for health, all in one remedies : कडुलिंबाचा पाला आरोग्यासाठी चांगला आणि त्वचेसाठीही.

बरेच आयुर्वेदिक उपाय आपण नेहमी करतो. बरेच घरगुती उपाय आपण करत असतो. विविध औषधे आपण वापरुन पाहतो. वर्षानुवर्षे वापरल्या जाणाऱ्या उपायांवर लोकांचा विश्वास बसलेला असतो. असाच एक उपाय म्हणजे कडूलिंबाचा पाला. असं म्हणतात औषध जेवढं कडू तेवढंच गुणकारी असतं. असे नैसर्गिक उपचार सर्वांत जास्त फायदेशीर ठरतात. (Neem leaves are a boon to health! Special remedies for health, all in one remedies )मुख्य म्हणजे अशा उपायांचे शक्यतो दुष्परिणाम होत नाहीत. कडुलिंबाचा पाला सगळीकडे उपलब्ध असतो. मात्र तो वैद्यकीयदृष्ट्या प्रचंड समृद्ध आहे हे आपल्याला माहिती नसते.

कडुलिंबाचा रस कडु असल्याने आपण तो सेवन करण्यासाठी नाक मुरडतो. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? शरीरासाठी कडुलिंबाचा पाला फारच उपयोगी ठरतो. रोगराईसुद्धा पाल्यामुळे दूर राहते. शरीराची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी कडुलिंबाची पाने फार फायदेशीर ठरतात.कडुलिंबात अनेक जीवनसत्वे व खनिजे असतात. यकृताचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी कडुलिंब मदत करते. त्याचप्रमाणे या पाल्याची रक्तशुद्धीकरणास मदत होते. सर्दी खोकल्याच्या संसर्गांपासूनदेखील हा पाला शरीराला वाचवतो. 

कडुलिंबाची पाने कर्करोग होण्याचा धोका कमी करतात, बरेच जण वजन कमी करण्यासाठी देखील या पानांचे सेवन करतात. दातांच्या, हिरड्यांच्या मजबूतीसाठी हा पाला उपयुक्त आहे. कडुलिंबाच्या पाल्यात फॅटी अॅसिड असते. जे केसांच्या मजबूतीसाठी व वाढीसाठी उपयुक्त असते. यात अँटी ऑक्सिडंट्स असतात. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ते उपयुक्त असतात. पाल्याचा रस केसांना लावून नाहणेसुद्धा फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे पाल्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्त्वचादेखील छान राहते. मुरूम, सुरकुत्या चेहऱ्यावरील डाग कमी होतात. तज्ञ सांगतात, खास करुन रिकाम्या पोटी कडुलिंबाचा पाला सेवन करावा, आतड्यांसाठी ते जास्त फायदेशीर ठरते. रक्तातील साखर वाढणे हे शारीरिकदृष्या एक वाईट लक्षण आहे, ही साखर आटोक्यात ठेवण्यासाठी कडुलिंबाचा पाला गुणकारी ठरतो.

या पाल्यात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते पोट साफ होण्यास मदत करते आणि पोट फुगणे थांबवते. या पाल्याचा रस विविध प्रकारे सेवन करता येतो. हळद आणि पाला एकत्र खाल्यास आणखी फायदेशीर ठरते. पाल्याची पेस्ट करुन, पाला पाण्यात उकळवून, त्याचा रस काढून, पाने भाजून, आदी. वेगवेगळ्या प्रकारे पाला सेवन करता येऊ शकतो. मात्र कडुलिंबाची ताजी पाने रिकाम्या पोटी चावून खाणे जास्त फायदेशीर ठरते.

English
हिंदी सारांश
Web Title : Neem Leaves: A boon for health, skin, hair, and digestion.

Web Summary : Neem leaves boost immunity, purify blood, and aid liver function. They help manage blood sugar, improve digestion, and promote healthy skin and hair. Consuming neem on an empty stomach is highly beneficial for overall well-being.
टॅग्स : हेल्थ टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीब्यूटी टिप्सकेसांची काळजी