जगभरात वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत. पण सगळ्यात जास्त मृत्यू हे हृदयरोगांमुळे होतात. हार्ट अटॅकमुळे दरवर्षी लाखो लोकांचा जीव जातो. कोलेस्टेरॉल आणि प्लाकमुळे धमण्यांमध्ये ब्लॉकेज होतात, ज्यामुळे हृदयाला योग्य प्रमाणात रक्त मिळत नाही आणि त्यामुळे अटॅक येतो.
चिंतेची बाब म्हणजे या समस्येचे संकेत गंभीर ब्लॉकेज झाल्यावर दिसतात. त्यानंतर अनेक महागड्या टेस्ट आणि नंतर सर्जरीचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र, घरबसल्याही तुम्ही धमण्यांमध्ये ब्लॉकेज आहे की नाही हे जाणून घेऊ शकता. यासाठी एक खास ट्रिक एक्सपर्टनी सांगितली.
नॅचरोपॅथ, अॅक्यूपंक्चरिस्ट आणि हॉलिस्टिक प्रॅक्टिशनर पूजा यांनी हुकिंग द मिडल फिंगर करण्याची पद्धत सांगितली आहे. या पद्धतीबाबत एक्सपर्ट आणि डॉक्टरांशिवाय फार कुणाला माहीत नसतं. याद्वारे हृदयात झालेल्या ब्लॉकेजबाबत जाणून घेता येऊ शकतं.
हार्ट ब्लॉकेज चेक करण्याची पद्धत
- हात एका फ्लॅट जागेवर ठेवा. तळहात वरच्या बाजूने असावा.
- मधल्या बोटाचं तळहाताला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
- असं रोज साधारण ३० ते ५० वेळा करा.
हृदयात ब्लॉकेज आहे की नाही?
अशाप्रकारे बोटाची एक्सरसाईज केली तर हृदयाकडे होणारं ब्लड सर्कुलेशन वाढतं. जर बोट तळहातावर लावताना वेदना होत असेल तर सावध होण्याची गरज आहे. कारण वेदना होत असेल तर सर्कुलेशन एरियामध्ये ब्लॉकेज असू शकतात.
या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
जेव्हा धमण्यांमध्ये जास्त अडथळा असतो तेव्हा काही लक्षणं दिसतात. जसे की, छातीत वेदना, श्वास भरून येणे, हृदयाचे ठोके अनियमित होणं, थकवा-कमजोरी, चक्कर येणं आणि बेशुद्ध पडणं इत्यादी.
हार्ट ब्लॉकेज दूर करण्यासाठी काय खावं?
काही पदार्थ असे असतात जे प्लाक तयार होण्यापासून रोखतात. बेरीज, काही मासे, हिरव्या पालेभाज्या, नट्स आणि सीड्स हृदयासाठी फायदेशीर असतात. यानं हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.