Join us

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवडतात ' या ' शेंगा आणि सुपर पौष्टिक पराठे, रोज खा - पंतप्रधानांचा खास सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2025 11:37 IST

What beans does PM Modi eat for good health : Super nutritious paratha recipe for immunity boost : Indian prime minister diet secrets for fitness: मोदींनी विशेष आवडणाऱ्या हिरव्या भाज्यांमध्ये शेवग्याच्या शेंगांच्या पराठ्यांचे नाव सर्वात आधी घेतले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज म्हणजेच १७ सप्टेंबर त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी देखील ते अधिक फिट आहेत. ते त्यांच्या फिटनेस आणि आहाराकडे विशेष लक्ष देतात.(Narendra Modi favorite food) त्यांच्या आरोग्याची चर्चा कायमच होत असते.  भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फिटनेस सिक्रेट नेहमीच चर्चेत असते. पहाटे उठून योगासनं करणं, दिवसाची सुरुवात गरम पाणी किंवा हर्बल ड्रिंकने करणं आणि आहारात पोषणमूल्यांनी भरपूर पदार्थांचा समावेश हे त्यांच्या दिनचर्येचे महत्त्वाचे भाग आहेत.(beans benefits for health) मोदींनी विशेष आवडणाऱ्या हिरव्या भाज्यांमध्ये शेवग्याच्या शेंगांच्या पराठ्यांचे नाव सर्वात आधी घेतले जाते.(healthy paratha recipe) हा पराठा दिसायला साधा असली तर त्याचे आरोग्याला जबरदस्त फायदे आहेत. हा पराठा ते आठवड्यातून दोन ते तीन वेळा खातात. (nutritious Indian paratha)

Pitru Paksha 2025 : श्राद्ध भोजनात करा पारंपरिक भोपळ्याची भाजी, चुकूनही घालू नका ‘या’ २ गोष्टी

दक्षिण भारतात शेवग्याच्या शेंगा भरपूर प्रमाणात खाल्ले जातात. याचं सूप, सांबार किंवा भाजी म्हणून आपण खाऊ शकतो. यात अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. याच्या फुलांचा, पानांचा आणि फळांचा औषधांसाठी वापर केला जातो. यात जीवनसत्त्व अ, ब१, ब२ आहे. तसेच कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचा चांगला स्त्रोत आहे. 

शेवग्याच्या बियांचे तेल पोटाला लावल्याने सूज कमी होते. शिवाय पोटाच्या अनेक समस्या देखील कमी होतात. याची पाने चावून खाल्ल्याने कर्करोगांपासून संरक्षण होते. बद्धकोष्ठता, पोटातील आम्ल कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे अल्सर टाळता येतो. यात नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग रोखण्याचे देखील गुणधर्म आहेत. यकृताच्या पेशींमध्ये चरबी जमा होण्यास कमी करु शकते. संशोधनानुसार शेवग्याच्या पानांचा अर्क साखर आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतो.

शेवग्याच्या पानांनी दमा आणि श्वसनमार्गातील जळजळ कमी करण्यास मदत करू शकतात. ते रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील मदत करू शकते. यामध्ये बीटा-कॅरोटीन असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे आणि डोळ्यांचे आजार रोखण्यास मदत करू शकते. 

टॅग्स : आरोग्यनरेंद्र मोदी