Join us

नखं फार पिवळी दिसतात, फंगल इन्फेक्शन तर नाही? नखांची अस्वच्छता महागात पडते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2023 13:43 IST

Nail fungus - Symptoms and causes अनेकजणी नेलपेण्ट चोपडून खराब नखं लपवतात, मात्र नखांचं इन्फेक्शन दुर्लक्ष करण्यासारखं नाही.

आपल्या शरीरात जर कोणत्याही प्रकारच्या पोषक तत्वांची कमतरता असेल, किंवा काही आजार झाले असतील तर त्यांची लक्षणे सर्वात आधी नखांवर दिसून येतात. मात्र नखांनाही फंगल इन्फेक्शन होऊ शकते, पिवळट बुरशी येते. त्याकडे लक्ष द्यायला हवे केवळ नेलपेण्ट चोपडून किंवा मेनिक्युअर, पेडिक्युअर करुन हा त्रास कमी होत नाही. नख पिकलं, फुटलं तर होणाऱ्या वेदनाही गंभीर असतात. त्यामुळे वेगळी लक्ष द्या.

नखांमध्ये फंगल इन्फेक्शन होण्याचे कारण म्हणजे अस्वस्छता. त्यामुळे नखांमध्ये घाण साचते. बोटांना काही दुखापत झाली तरी इन्फेक्न होऊ शकते.

नखांना खोबरेल तेल लावा, त्यामुळे बुरशीचं प्रमाण थोडं कमी होऊ शकतं.

नखांमध्ये घाण साचल्यास कोरफड जेल लावा. त्यात अँटीफंगल गुणधर्म असतात. घाण कमी होईल.

नखांमधील घाण साफ करण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करू शकतो. बेकिंग सोड्याची पेस्ट बनवा आणि ही पेस्ट नखांवर लावा.

ऍपल सायडर व्हिनेगरमध्ये अँटीफंगल गुणधर्म आढळतात, जे फंगस कमी करण्याचे उत्तम काम करतात. यासाठी व्हिनेगरमध्ये थोडेसे पाणी मिसळा. व हे मिश्रण बोटांवर लावा.

नखांची स्वच्छता आणि देखभाल अत्यंत महत्त्वाची आहे.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य