Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > तुम्हालाही नख खाण्याची सवय आहे का? शरीर देतं संकेत, पोटात नखं गेली तर काय होतं?

तुम्हालाही नख खाण्याची सवय आहे का? शरीर देतं संकेत, पोटात नखं गेली तर काय होतं?

Nail Biting Habit: What Your Body Is Trying to Tell You, What Happens If Nails Go Into the Stomach? : नखं खाण्याची सवय नक्की का लागते ? जाणून घ्या कारण.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2026 13:28 IST2026-03-06T18:45:19+5:302026-03-08T13:28:23+5:30

Nail Biting Habit: What Your Body Is Trying to Tell You, What Happens If Nails Go Into the Stomach? : नखं खाण्याची सवय नक्की का लागते ? जाणून घ्या कारण.

Nail Biting Habit: What Your Body Is Trying to Tell You, What Happens If Nails Go Into the Stomach? | तुम्हालाही नख खाण्याची सवय आहे का? शरीर देतं संकेत, पोटात नखं गेली तर काय होतं?

तुम्हालाही नख खाण्याची सवय आहे का? शरीर देतं संकेत, पोटात नखं गेली तर काय होतं?

नखं खाण्याची सवय अनेकांना लहानपणापासून लागलेली दिसते. काही जणांना ही फक्त छोटीशी सवय वाटते, पण प्रत्यक्षात तिचा संबंध मानसिक स्थिती, ताणतणाव आणि सवयींच्या पद्धतीशी असू शकतो. नख ठरवून कोणी खात नाही. ती आपसूक होणारी कृती आहे. (Nail Biting Habit: What Your Body Is Trying to Tell You, What Happens If Nails Go Into the Stomach?)पटकन लक्षातही येत नाही की आपण नखं खात आहोत. अनेक वेळा ताण, चिंता किंवा अस्वस्थता यामुळे नखं खाण्याची सवय लागते. एखादी गोष्ट मनात सतत चालू असेल, अभ्यासाचा ताण असेल, कामाचा दबाव असेल किंवा कंटाळा आला असेल तर काही जण नकळत नखं खायला लागतात. ही सवय म्हणजे ताण असल्याची प्रतिक्रिया असते. 

काही वेळा ही सवय लहानपणीच लागते आणि नंतर ती  कायम राहते. मुलं एखाद्याला पाहून नखं खाण्याची सवय शिकू शकतात. त्यामुळे लहानपणीच सवय मोडलेली बरी. सतत हात तोंडाजवळ नेण्याची सवय झाल्यावर ते नकळत नखं खातात आणि हळूहळू ती सवय पक्की होते. त्यामुळे मुलांना त्याचे तोटे समजावून सांगा. नखं खाण्याची सवय आरोग्यासाठीही चांगली नाही. नखांखाली अनेक प्रकारचे जंतू आणि घाण जमा झालेली असते. नखं तोंडात गेल्यावर हे जंतू शरीरात जाऊ शकतात. त्यामुळे पोटाचे त्रास, संसर्ग किंवा जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते.

कधी कधी नखांचे छोटे तुकडे गिळले जातात. अशा वेळी ते पोटात गेल्यावर साधारणपणे पचनसंस्थेतून बाहेर पडतात, पण सतत असे झाले तर पोटात अस्वस्थता, पचनाचे त्रास किंवा घशात खवखव जाणवू शकते. त्यामुळे ही सवय टाळणेच योग्य ठरते. नखाला टोक असते. त्यामुळे शरीराच्या आतील भागात ओरखडे उठू शकतात. जखम होऊ शकते. त्यामुळे सवय वेळीच सोडलेली बरी. 

याशिवाय नखं सतत चावल्यामुळे नखांची वाढ बिघडू शकते, नखांचा आकार खराब होतो आणि बोटांच्या त्वचेलाही इजा होऊ शकते. काही वेळा त्वचा फाटणे, सूज येणे किंवा संसर्ग होण्याची शक्यता असते. नखं दिसायला फार विचित्र होतात. म्हणूनच नखं खाण्याची सवय किरकोळ वाटली तरी तिच्याकडे दुर्लक्ष करु नये. ताण कमी करण्यासाठी इतर सवयी लावणे, नखं लहान ठेवणे किंवा हात व्यस्त ठेवणे अशा उपायांनी ही सवय कमी करण्यास मदत होऊ शकते. योग्य वेळी लक्ष दिल्यास ही सवय सहजपणे कमी करता येते.                      

Web Title : नाखून चबाने की आदत: स्वास्थ्य जोखिम, कारण और कैसे रोकें।

Web Summary : नाखून चबाना, अक्सर तनाव से जुड़ा होता है, संक्रमण जैसे स्वास्थ्य संबंधी समस्याएं पैदा कर सकता है। इससे नाखूनों और आसपास की त्वचा को भी नुकसान हो सकता है। इस आदत को तोड़ने में तनाव प्रबंधन और नाखूनों को छोटा रखना शामिल है।

Web Title : Nail-biting habit: Health risks, causes, and how to stop it.

Web Summary : Nail-biting, often linked to stress, can cause health issues like infections. It can also damage nails and surrounding skin. Breaking the habit involves stress management and keeping nails short.