Join us

मसल पेन- गुडघ्यांमधून आवाज येतो? पायांचे स्नायू मजबूत ठेवण्यासाठी खा ३ पदार्थ, हाडं होतील बळकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2025 12:12 IST

Muscle and knee pain in young age: Foods for strong leg muscles: Knee pain remedy food: मसल पेन होणे ही समस्या सामान्य असली तरी खनिजांची कमतरता, शरीरात पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कमी झाल्यास पेटके येतात.

आपले स्नायू मजबूत असतील तर आरोग्य सुरळीत असते. जपानमध्ये असे म्हटले जाते की, मृत्यू पायांपासून सुरु होतो आणि चीनमध्ये असं म्हटलं जातं की, एखाद्या व्यक्तीचे पाय वृद्ध होतात तसा तो वृद्ध होत जातो.(Knee pain remedy food) अनेकदा चालताना, उठता-बसता गुडघ्यांमधून आवाज येतो. स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येतात. वेदना इतक्या जात असतात की, आपल्याला उठायला ही होत नाही. (Natural foods for muscle pain) खूप चालल्याने किंवा व्यायाम केल्याने स्नायूंवर ताण पडतो ज्यामुळे क्रॅम्प्स येतात.(Best foods to prevent knee pain in young adults) शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी मिळाले नाही तरी देखील स्नायूंमध्ये पेटके येतात.(Foods for strong leg muscles) वाढत्या वयानुसार आपल्याला वात दोषाचा सामना करावा लागतो.(Bone strengthening foods) शरीरात कडकपणा आणि पेटके वाढू लागतात. आपले पाय कमकुवत झाले तर नुसते चालणेच नाही तर संपूर्ण आरोग्याचे चक्र बिघडते. 

चेहऱ्यावर शीट मास्क लावण्याची योग्य पद्धत कोणती? तज्ज्ञांनी सांगितले ४ उपाय, ब्लॅकहेड्स - पिंपल्स होतील कमी

मसल पेन होणे ही समस्या सामान्य असली तरी खनिजांची कमतरता, शरीरात पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कमी झाल्यास पेटके येतात. वयोमानानुसार शिरा आकुंचन पावतात. ज्यामुळे स्नायूंपर्यंत रक्त योग्यरित्या पोहोचू शकत नाही. तसेच मधुमेह किंवा इतर आजारांमुळे देखील या समस्या उद्भवतात. सतत औषधे घेतल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम देखील आपल्यावर होतो. अशावेळी आपण काय करायला हवे पाहूया. 

1. झोपण्यापूर्वी स्ट्रेचिंग करा. यामुळे पाय आणि मांड्यांचे स्नायू ताणल्याने आराम मिळेल. कोमट तेलाने मालिश करा. तीळाचे तेल, ऑलिव्ह ऑइल किंवा शुद्ध तुपाने मालिश केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. दर १ ते २ तासांनी ५ ते १० मिनिटे चाला. यामुळे पायातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. भरपूर पाणी प्या. शरीराला हायड्रेट ठेवा. बीपी, शुगर किंवा कोलेस्ट्रेरॉलची औषधे घेत असाल तर डॉक्टरांना विचारा. 

2. आहारात केळी आणि भिजवलेले मनुके खा. केळीमध्ये पोटॅशियम असते. आणि मनुक्यामध्ये लोह आणि मॅग्नेशियम असते. दररोज सकाळी एक केळी आणि ४ ते ५ मनुके खा. 

3. तीळ आणि दूध प्यायाल्याने देखील आराम मिळतो. तीळात नैसर्गिक कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. हे भाजून दुधासोबत घ्या. किंवा त्याची चटणी बनवून खा. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्या. यामुळे स्नायू दुखणे किंवा सूज कमी होते. चांगली झोप लागून शरीराला आराम मिळतो. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स