Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सतत तोंड येतं, जिभेवर आणि तोंडात लालेलाल फोड? करा आजीच्या बटव्यातील हा उपाय

सतत तोंड येतं, जिभेवर आणि तोंडात लालेलाल फोड? करा आजीच्या बटव्यातील हा उपाय

Natural treatment for mouth ulcers: Mouth ulcer treatment at home: आजीबाईंच्या बटव्यातील खास उपाय करुन पाहूया. ज्यामुळे तोंड येण्याच्या समस्या कमी होतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2025 15:47 IST2025-07-21T15:42:44+5:302025-07-21T15:47:02+5:30

Natural treatment for mouth ulcers: Mouth ulcer treatment at home: आजीबाईंच्या बटव्यातील खास उपाय करुन पाहूया. ज्यामुळे तोंड येण्याच्या समस्या कमी होतील.

Mouth ulcer home remedy Grandma's remedy for mouth sores Ayurvedic cure for tongue blisters | सतत तोंड येतं, जिभेवर आणि तोंडात लालेलाल फोड? करा आजीच्या बटव्यातील हा उपाय

सतत तोंड येतं, जिभेवर आणि तोंडात लालेलाल फोड? करा आजीच्या बटव्यातील हा उपाय

तोंडाचा अल्सर, तोंड येण्याची समस्या ही अनेकांमध्ये वारंवार पाहायला मिळते.(Mouth ulcers) शरीरातील उष्णता वाढली किंवा प्रमाणापेक्षा जास्त औषधे खाल्ल्यास आपल्याला तोंड येते. यामुळे तोंडात व्रण पडणे, अल्सर होणे, जिभेला किंवा गालाच्या आत फोड येणे, पांढरे डाग तयार होणे यांसारख्या समस्या उद्भवतात.(mouth sores) 
तोंड आल्यानंतर आपल्याला खाता-पिता येत नाही.(tongue blisters) पाणी पिताना देखील त्रास होतो. ब्रश करताना किंवा बोलताना असह्य वेदना होतात. तोंड येण्याची कारणे अनेक आहेत.(Home remedy for red spots in mouth) तोंडाच्या आत येणाऱ्या लाल आणि पांढर्‍या रंगांच्या डागामुळे सतत जळजळ, वेदना आणि सतत काही तरी टोचल्यासारखे जाणवत राहाते. अशावेळी आपण औषधे खातो ज्याचा विपरीत परिणाम होतो.(Herbal remedy for tongue and mouth sores) तोंडाच्या वेदना कमी होण्याऐवजी त्या अधिक वाढतात. परंतु आजीबाईंच्या बटव्यातील खास उपाय करुन पाहूया. ज्यामुळे तोंड येण्याच्या समस्या कमी होतील. (Instant relief for mouth ulcers)

गुडघ्यापर्यंत वाढतील केस, आठवड्यातून २ वेळा लावा 'हे' तेल! केस होतील काळेभोर-लांबसडक-सुंदर

'आपली आजी' या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आजी म्हणताय की जर वारंवार तोंड येत असेल तर स्वयंपाकघरातील ५ पदार्थ चावून खाण्याचा सल्ला दिला आहे. पाहूया काय करायला हवं

1. साजूक तूप हे तोंड आलेल्या ठिकाणी लावायला हवं. ज्यामुळे जखम लवकर भरण्यास मदत होईल. तूप शरीराला आवश्यक पोषक तत्व पुरवते. ज्यामुळे जळजळ कमी होते आणि शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते. 

2. हिरवी कोथिंबीर दिवसातून २ ते ३ वेळा बारीक चावून खायला हवे. यात अनेक पोषक तत्वे असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. 


3. सुके खोबरे थोडेसे बारीक करुन चावून खायला हवे. सुके खोबरे खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. यात असणारे पोषक तत्व रोगप्रतिकारशक्ती वाढते. ज्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते आणि पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. 

4. वेलची पूडमध्ये मध घालून ते तोंड आलेल्या ठिकाणी लावल्यास फायदा होतो. यामुळे तोंडाची दुर्गंधी तर दूर होते आणि तोंडाचे आरोग्य सुधारते. मध आणि वेलची एकत्र घेतल्याने आतड्यांची हालचाल सुधारते. 

5. हळदीत मध मिसळून तोंडातील जखमेवर लावल्यास तोंडाच्या समस्या कमी होतात. इतकेच नाही तर आजी म्हणतात तोंड येण्याचे कारण अधिक मसालेदार, तिखट पदार्थ खाल्ल्याने आपली पचनसंस्था बिघडते. ज्यामुळे वारंवार तोंड येते. हे आयुर्वेदिक आजीबाईंचे उपाय केल्याने आपल्याला नक्कीच आराम मिळेल. 

 

Web Title: Mouth ulcer home remedy Grandma's remedy for mouth sores Ayurvedic cure for tongue blisters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.