हल्ली कमी वयातच वेगवेगळे आजार मागे लागत आहेत. लठ्ठपणा, शुगर, बीपी, कोलेस्टेरॉल हे त्रास तर आहेतच, पण त्यासोबतच फॅटी लिव्हरचा त्रासही हल्ली खूप लोकांना कमी वयातच होत आहे. लिव्हरचं आरोग्य जपायचं तर मद्यपान, धुम्रपान या गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्या, हे आपल्याला माहितीच आहे. तेल, तूप, बटर असे पदार्थ खाल्ल्यानेही लिव्हरचे आरोग्य बिघडत जाते, हे आपण जाणतो. पण तेल, तूप किंवा बटरपेक्षाही जास्त घातक असणारे पदार्थ आपण नेहमीच खातो आणि विशेष म्हणजे तेच पदार्थ लिव्हरचं आरोग्य बिघडविण्यासाठी सगळ्यात जास्त कारणीभूत ठरतात (most dangerous food for liver). ते पदार्थ नेमके कोणते ते पाहूया..(reasons and causes of fatty liver)
लिव्हरसाठी घातक ठरणारे अन्नपदार्थ
अमेरिकन लिव्हर फाउंडेशन आणि National Health Interview Survey, 2018 या अमेरिकेत झालेल्या अभ्यासानुसार असं समोर आलेलं आहे की हाय फ्रुक्टोज कॉर्न शुगर म्हणजेच HFCS असणारे पदार्थ तुमच्या लिव्हरसाठी अतिशय घातक आहेत.
सध्या जबरदस्त ट्रेण्डिंग असणारा ३×३ फिटनेस फंडा- वजन कमी होईल झरझर, करून पाहा
कारण फ्रुक्टोज हा एक असा घटक आहे जो खूप पटकन फॅट्समध्ये रुपांतरीत होतो आणि त्यामुळे लिव्हरच्या कार्यात अडथळा येऊन लिव्हर खराब होण्याचा धोका जास्त वाढतो. कुकीज, कॅण्डी, सॉफ्ट ड्रिंक्स, बाजारात मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे सॉस या सगळ्यांमध्ये फ्रुक्टोज खूप जास्त प्रमाणात असते. त्याचप्रमाणे फ्लेवर्ड योगर्ट, प्रोसेस्ड फूड या सगळ्यांमध्येही फ्रुक्टोज असतेच.
हे सगळे पदार्थ खाण्याचं प्रमाण हल्ली खूप जास्त वाढलेलं आहे. लहान मुलं तर हे पदार्थ खातातच पण मोठी मंडळीही आनंदाने हे सगळे पदार्थ एन्जॉय करतात.
दिवाळीत लाडक्या लेकीसाठी करा १ ग्रॅम वजनात सोन्याच्या बिंदल्या, बघा सुंदर डिझाईन्स..
त्यामुळे केवळ दारू प्यायल्यानेच फॅटी लिव्हरचा त्रास होतो असं मुळीच नाही. वर सांगितलेले फ्रुक्टोजयुक्त पदार्थ खाणंही टाळायला हवं, असं तज्ज्ञ सांगतात. दिवाळीच्या दिवसांमध्येही कुकीज, कॅण्डी यांचे पॅक घरोघर दिले जातात. ते खाण्याचा मोह आवरायलाच हवा.