सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपण आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतो.(Health Issue) परंतु, नंतर याचा आपल्याला गंभीर परिणाम सहन करावा लागतो. हल्ली हृदयविकाराचा झटका, कोलेस्टेरॉल सारखे आजार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.(morning walk health tips) अनेकदा चालताना, उठताना किंवा बसताना आपल्याला पायात, कंबरेत कळ येते. अशावेळी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण आपले शरीर आपल्याला की संकेत देत असतात. ( high cholesterol symptoms)
जेव्हा आपण वॉक करायला जातो तेव्हा आपल्या शरीरात अनेक बदल जाणवू लागतात.(heart attack warning signs) जी उच्च कोलेस्टेरॉलची लक्षणे असतात. जर ही लक्षणे वेळीच ओळखली तर आपण हाय कोलेस्टेरॉल आणि हृदयविकाराचा झटका वेळीच येण्यापासून रोखू शकतो.(cholesterol management tips)
केस विंचरताना हातात मोठी गुंतवळ येते? ६ सवयींमुळे गळतात केस-टक्कलही पडू शकतं लवकर
1. आपण जेव्हा मॉर्निंग वॉकला जातो तेव्हा आपल्या पायांवर ताण येऊ ते दुखू लागतात. जर हे वारंवार होत असेल तर पेरिफेरल आर्टरी डिसीजचे लक्षण असू शकते. हा आजार तेव्हा होतो जेव्हा कोलेस्टेरॉल पायांच्या नसांमध्ये जमा होतो. ज्यामुळे रक्तप्रवाहामध्ये अडथळा येतो.
2. जर आपल्याला थोडे देखील चालल्यानंतर धाप लागणे किंवा श्वास घेण्यास अडचण येत असेल तर वेळीच डॉक्टरांकडे जा. हृदयापर्यंत योग्य प्रमाणात ऑक्सिजन न पोहोचल्यास आपल्याला उच्च कोलेस्टेरॉलचा सामना करावा लागू शकतो.
3. चालताना छातीत दाब किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर काळजी घ्या. हे हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या एनजाइनाचे लक्षण असू शकते. या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.
कोरड्या-खराट्यासारख्या केसांवर जादू करेल 'हा' हेअर मास्क, केस होतील मऊ, सुळसुळीत आणि काळेभोर
4. हवामानात बदल झाल्यास अनेकांचे हात-पाय थंड पडतात, हाता-पायांच्या बोटांना मुंग्या येतात. असं जर वारंवार होत असेल तर हे कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे होऊ शकते. शरीरात रक्ताभिसरणाची कमतरता जाणवल्यास किंवा पुरेसे रक्त न मिळाल्यास हात-पाय गार होतात.
5. आपले पाय किंवा घोटे चालल्यानंतर किंवा अचानक सुजले तर ही रक्ताभिसरणाची समस्या असू शकते. उच्च कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्यांवर दबाव येतो, ज्यामुळे शरीराच्या काही भागांमध्ये पाणी साचू लागते. ही लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.