Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रोज सकाळी उठल्यावर डोकं जड झाल्यासारखं वाटतं? करा ५ गोष्टी- सकाळची डोकेदुखी होईल बंद

रोज सकाळी उठल्यावर डोकं जड झाल्यासारखं वाटतं? करा ५ गोष्टी- सकाळची डोकेदुखी होईल बंद

Morning dizziness, Do you feel like your head is heavy every morning when you wake up? Do 5 things - your morning headache will go away : रोज सकाळी डोकं दुखतं तर त्यामागे असतात अनेक कारणे. पाहा काय उपाय करावे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2025 16:53 IST2025-08-25T16:45:42+5:302025-08-25T16:53:41+5:30

Morning dizziness, Do you feel like your head is heavy every morning when you wake up? Do 5 things - your morning headache will go away : रोज सकाळी डोकं दुखतं तर त्यामागे असतात अनेक कारणे. पाहा काय उपाय करावे.

Morning dizziness, Do you feel like your head is heavy every morning when you wake up? Do 5 things - your morning headache will go away | रोज सकाळी उठल्यावर डोकं जड झाल्यासारखं वाटतं? करा ५ गोष्टी- सकाळची डोकेदुखी होईल बंद

रोज सकाळी उठल्यावर डोकं जड झाल्यासारखं वाटतं? करा ५ गोष्टी- सकाळची डोकेदुखी होईल बंद

सकाळी उठल्यावर डोके दुखणे ही अनेकांना सतावणारी सामान्य समस्या आहे. ती केवळ थकव्यामुळेच होते असे नाही तर त्यामागे अनेक कारणे असतात. (Morning dizziness, Do you feel like your head is heavy every morning when you wake up? Do 5 things - your morning headache will go away)रात्री नीट झोप न लागणे, वारंवार जाग येणे किंवा झोपेत श्वास रोखला जाणे म्हणजेच स्लीप ॲपनिया ही डोकेदुखीची मोठी कारणे ठरतात. मात्र फक्त काही गंभीर कारणे असतील असे नाही. काही वेळा सामान्य कारणेही असतात. 

१. काही जणांना उशीची उंची चुकीची असल्यामुळे मानेला ताण येतो आणि त्याचा परिणाम डोक्यावर होतो. डोकं जड होतं आणि दुखतं. 

२. रात्री झोपण्यापूर्वी जास्त प्रमाणात मद्यपान किंवा कॅफीन घेतल्यानेही सकाळी डोकेदुखी जाणवते. शरीरातील पाण्याची कमतरता म्हणजे डिहायड्रेशन होते. त्यामुळे डोकं दुखत. पाणी भरपूर पिणे गरजेचे आहे. 

३. रात्री उशिरापर्यंत मोबाइल किंवा कॉम्प्युटरचा वापर करून डोळ्यांवर ताण देणे ही कारणे देखील सकाळच्या डोकेदुखीशी संबंधित आहेत.

४. दात खाण्याची सवय अनेकांना असते. झोपेत जबड्यावर जोर देऊन दात चावणे त्याचा आवाज करणे यामुळे डोकं दुखतं. ही कृती पोटात जंत असल्यामुळे होते. त्यामुळे जंतांचे औषध उपयुक्त ठरते. 

५. काही पोषक घटकांची कमतरता शरीरात असेल तर असं डोकं दुखतं. जसे की जीवनसत्त्व 'बी', 'सी', 'बी १२' यांची कमतरता असेल किंवा लोहाची कमतरता असेल. त्यामुळे सकाळी उठल्यावर डोकं दुखतं किंवा चक्कर येते.   

यावर सोपे उपाय करायचे झाले तर सर्वात आधी पुरेशी व शांत झोप घेणे आवश्यक आहे. रात्री झोपण्यापूर्वी कॅफिन किंवा मद्य टाळावे आणि झोपण्याची वेळ ठरवा योग्य वेळीच झोपा. उशी मऊसर आणि मानेला योग्य आधार देणारी असावी. झोपण्याआधी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि सकाळी डोकेदुखी टाळता येते. खोलीत पुरेशी हवा खेळती ठेवणे आणि झोपण्याआधी स्क्रीनचा वापर कमी करणे देखील उपयोगी ठरते. मात्र जर रोज सकाळी हा त्रास होतो तर ते गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

Web Title: Morning dizziness, Do you feel like your head is heavy every morning when you wake up? Do 5 things - your morning headache will go away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.