Join us

झोपेतून उठल्यावर छातीत धडधडते, भीती वाटते- जीव घाबरतो? मॉर्निंग एन्झायटीचा त्रास, डॉक्टर म्हणतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2025 12:58 IST

Morning panic attack tips: Natural ways to deal with anxiety: Mental health tips: पोटात गोळा येऊन भीती वाटू लागते. छातीत वारंवार धडधडत इतकंच नाही तर जीव घाबरु लागतो. अशावेळी काय करावं?

सकाळी झोपेतून उठल्यानंतर आणखी काही काळ झोपून राहाव असं वाटतं. (Morning panic attack tips) पण काही वेळाने उठण्यापासून ते अनेक कामे करण्याच देखील आपल्यावर दडपण येतं. (Natural ways to deal with anxiety) एखाद्या गोष्टीची काळजी आपल्याला वाटते. पोटात गोळा येऊन भीती वाटू लागते. छातीत वारंवार धडधडत इतकंच नाही तर जीव घाबरु लागतो. (Mental health tips)

आजूबाजूच्या अनेक गोष्टींमुळे मनात चिंता दाटून येते. अस्वस्थ वाटतं, घाम येणे, हृदयाची धडधड वाढणं आणि निराश होणं यांसारख्या गोष्टी आपल्यासोबत वारंवार घडू लागतात. (Morning anxiety symptoms) ऑफिस, कॉलेज किंवा इतर कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर जाऊच नये अशी भीती देखील सतावत राहते. पूर्वी असं क्वचित घडायचं पण आता ही समस्या अनेकांमध्ये पाहायला मिळते आहे असं डॉक्टर म्हणतात. (Why do I wake up anxious Wake up)

Monsoon Food : मुलं भाज्याच खात नाहीत? करा चमचमीत व्हेजिटेबल सोया पुलाव, टेस्ट भी हेल्थ भी..

डॉक्टर सांगतात मॉर्निंग एंग्जायटी ही समस्या आता सामान्य होत चालली आहे. जे लोक जास्त प्रमाणात ताण, चिंता किंवा पुरेशा प्रमाणात झोप घेत नाही. त्यांना या समस्येला सामोरे जावे लागते. यामध्ये अचानक झोप उघडते. मानसिक अस्वस्थता जाणवू लागते. सकाळी आपल्या शरीरातील कॉर्टिसोल नावाचा ताण संप्रेरक हा जास्त प्रमाणात सक्रिय असतो. यामध्ये आपली जीवनशैली, झोपेची गुणवत्ता आणि आहार सगळ्यात महत्त्वाचा असतो.

सकाळी उठल्याबरोबर अस्वस्थता, चिंता किंवा भीती वाटणे हे केवळ भावनिक प्रतिक्रिया नाही तर हार्मोनल असंतुलन, ताण आणि झोपेच्या कमतरतेशी संबंधित मानसिक स्थिती आहे. सकाळी शरीरात कोर्टिसोल हार्मोनची पातळी जास्त असते. ती वाढली की आपल्याला अस्वस्थ वाटू लागते. ज्याकडे दुर्लक्ष केल्यास नैराश्य, पॅनिक अॅटॅक किंवा ताण वाढू शकतो. यासाठी आपल्याला पुरेशा प्रमाणात झोप घ्यायला हवी. स्क्रीन टाइम कमी करायला हवा, कॅफिन किंवा अल्कोहोलचे सेवन जास्त प्रमाणात करु नका. नकारात्मक विचारांमध्ये अडकू नका.

आजपासूनच ६ पदार्थांना म्हणा कायमचं गुडबाय! डॉक्टर सांगतात, तरुण दिसायचं असेल तर सोपा उपाय

या आजारावर मात करण्यासाठी आपल्याला सकस आहार, ध्यान, योगा करायला हवा. सकाळी उठल्यानंतर ५ मिनिटे सखोल श्वास घ्या. फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गोष्टींपासून दूर राहा. दिवसाची सुरुवात योगासने, ध्यान आणि स्ट्रेचिंगने करा. सकारात्मक गोष्टींचा विचार करा. आपली झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा. गरज असेल तर थेरपिस्टचा सल्ला घ्या.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स