पावसाळ्यात सर्दी-खोकला आणि ताप यांसारखे संसर्गजन्य आजार होत असतात. (Monsoon Health tips) परंतु, या काळात रस्त्यावर साचलेलं पाणी आणि अस्वच्छतेमुळे लेप्टोस्पायरोसिस या संसर्गजन्य आजाराचा धोका देखील वाढतो.(leptospirosis disease) पावसाळ्यात रस्त्याच्यामध्ये किंवा कुठेही खड्डा असेल तिथे पाण्याचे डबके पाहायला मिळतात.(Infectious disease) या ठिकाणी अनेक जंतू, माशा किंवा डासांचा उच्छाद आपल्याला पाहायला मिळतो. पावसाळा सुरु झाला की, अनेक साथीचे रोग आपले डोके वर काढतात. (leptospirosis symptoms)
रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पाय जरा जपूनच टाकायला हवे. अनेकदा चिखलामुळे किंवा घाणीमुळे पाय खराब झाल्यामुळे आपण सहज त्या डबक्यात पाय घालतो.(Monsoon infection care) परंतु, याचा गंभीर परिणाम आपल्याला सहन करावा लागू शकतो. इतकेच नाही तर लहान मुले या डबक्यात उड्या मारतात. पण यामुळे लेप्टो नावाचा संसर्गजन्य आजार होण्याची अधिक शक्यता असते.
सर्दी-खोकल्यामुळे हैराण, नाक चोंदलं, श्वासही घेता येतं नाही? ‘हा’ काढा प्या, त्रास होईल कमी
उंदीर आणि घुशींच्या मलमूत्रातून लेप्टो नावाचा संसर्गजन्य आजार हा साचलेल्या पाण्यातून माणसांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात पाय न बुडवणे आणि वैयक्तिक स्वच्छता न राखणे अंत्यत महत्त्वाचे आहे.असा सल्ला डॉक्टरांनी दिला.
आपल्या पायाला कोणतीही जखम झाली असेल आणि त्यावर उंदीराचे मलमूत्र मिसळलेल्या पाण्याच्या संपर्कात आपण आल्याने लेप्टो नावाचा आजार होऊ शकतो. या साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना देखील करण्यात येत आहेत.
ऐन तारुण्यात गुडघे दुखतात, कंबरदुखीचा त्रासही वाढला? आयुर्वेदिक तेलाने करा मालिश- त्रास होईल कमी
या आजाराची लक्षणे काय?
सतत ताप येणे, डोकेदुखी, थंडी वाजणे, स्नायुदुखी, उलटी आणि कावीळ सारखी लक्षणे या आजारात पाहायला मिळतात. तसेच रुग्णांना श्वास घेण्यास अडचणी येतात. मूत्रपिंड आणि यकृत निकामी होते. यावर योग्यवेळी उपचार मिळाल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू होण्याचा धोका टाळता येतो.
कशी घ्याल काळजी?
1. पावसाळ्यात पाणी तुंबलेल्या ठिकाणाहून चालू नये. पाण्यात चालताना गुडघ्यापर्यंत गमबूट घालावेत. तसेच दूषित पाण्याच्या संपर्कात येऊ नका.
2. पायावर कोणतीही जखम असेल तर त्यावर वेळीच योग्य तो उपचार करावा. दूषित पाण्यामुळे जखम आणखी वाढून संसर्गजन्य आजार वाढू शकतात.
3. घाणीच्या पाण्यातून घरी आल्यानंतर अंघोळ करावी. तापासारखी लक्षणे दिसल्यावर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कचरा वेळेत साफ करावा. घराजवळ पाणी साचणार किंवा तुंबणार नाही याची काळजी घ्यावी. पावसाळ्यात होणारे संसर्गजन्य आजार, ताप किंवा जखमांकडे दुर्लक्ष करु नका.