पावसाळा, हवामान बदल आणि संसर्गजन्य आजारांमुळे आपल्याला अनेक व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होतो.(viral infection) या काळात सर्दी, खोकला, शरीर थकलेलं वाटणं, अंगदुखी, ताप आणि अशक्तपणा जाणवतो. याला बॉडी लो होणं असं देखील म्हणतात.(Immunity boosting) रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याने आपल्याला उठण्या-बसण्याची ताकद राहत नाही. यावर वेळीच लक्ष दिले नाही तर अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते.(Ayurvedic chikki for health)
इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी आपण आहारात काही महत्त्वाचे पदार्थ खायला हवे.(Post-illness strength foods) अशावेळी आपण सूप, काढा, आल्याचा चहा, हळदीचे दूध किंवा तुळशी व गवती चहा अशा पदार्थांचा आहारात समावेश करतो.(Homemade chikki for recovery) ज्यामुळे काही प्रमाणात आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली होते. पण इम्युनिटी बूस्टसाठी आपण खास चिक्की तयार केली तर शरीर तंदुरुस्त होण्यास मदत होईल. पावसाळ्यात आपल्याला गळ्याचे इन्फेक्शन होते.(Traditional Indian immunity booster) ज्यामुळे खाताना पिताना आपल्याला त्रास होतो. अशावेळी आपण अनेक औषधेपचार करतो. आपण इम्युनिटी बूस्टसाठी तयार करुन खाऊ शकतो.
दमट वातावरणामुळे मीठ ओलसर होते- गुठळ्या होतात? ५ सोपे घरगुती उपाय- दरवर्षीचा त्रास गायब
साहित्य
भाजलेले चणे - ३०० ग्रॅम
बदाम - ७० ग्रॅम
काजू - ७० ग्रॅम
शेंगदाणे - ७० ग्रॅम
मखाणा - ५० ग्रॅम
गूळ - २५० ग्रॅम
पाणी - १५० ग्रॅम
काळी मिरी - ५ ते ६
सुंठ पावडर - अर्धा चमचा
तूप - २ चमचे
कृती
1. सगळ्यात आधी कढईमध्ये चणे, शेंगदाणे, बदाम, काजू, मखाने आणि तूप घालून ७ ते ८ मिनिटे चांगले भाजून घ्या.
2. आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेले सर्व साहित्य आणि काळेमिरी, सुंठ पावडर घालून त्याचा पावडर तयार करा.
3. त्यानंतर एका भांड्यात पाणी आणि गूळ घालून चांगले वितळवून घ्या. गूळाचे पाणी झाल्यानंतर त्यात मिक्सरमध्ये वाटलेले सर्व साहित्य घाला. यात वरुन भाजलेले चण्याची डाळ घाला.चमच्याने चांगले हलवत राहा. मिश्रण चांगले घट्ट होईपर्यंत चमचा हलवत राहा.
4. आता एका ताटाला तूप लावून मिश्रण पसरवून घ्या. थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडा. आपण याचे लाडू देखील बनवून खाऊ शकतो. साठवण्यासाठी आपण हे फ्रीजमध्ये देखील ठेऊ शकतो.