Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > गरम पाण्यात मिसळा हे ३ पदार्थ , पोट लगेच होईल साफ, गॅस - अपचन आणि बद्धकोष्टतेचा त्रास होणार नाही

गरम पाण्यात मिसळा हे ३ पदार्थ , पोट लगेच होईल साफ, गॅस - अपचन आणि बद्धकोष्टतेचा त्रास होणार नाही

Mix these 3 ingredients in hot water, your stomach will be clean immediately, you will not suffer from gas, indigestion and constipation : आरोग्यासाठी आणि पचनासाठी चांगले असे पेय रोज प्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2026 18:50 IST2026-04-02T18:48:28+5:302026-04-02T18:50:14+5:30

Mix these 3 ingredients in hot water, your stomach will be clean immediately, you will not suffer from gas, indigestion and constipation : आरोग्यासाठी आणि पचनासाठी चांगले असे पेय रोज प्या.

Mix these 3 ingredients in hot water, your stomach will be clean immediately, you will not suffer from gas, indigestion and constipation. | गरम पाण्यात मिसळा हे ३ पदार्थ , पोट लगेच होईल साफ, गॅस - अपचन आणि बद्धकोष्टतेचा त्रास होणार नाही

गरम पाण्यात मिसळा हे ३ पदार्थ , पोट लगेच होईल साफ, गॅस - अपचन आणि बद्धकोष्टतेचा त्रास होणार नाही

पोट साफ न होणे, अपचन, गॅस, पोट फुगणे या समस्या आजकाल खूप सामान्य झाल्या आहेत. चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार आणि पाण्याचे कमी सेवन यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. अशा वेळी काही सोपे घरगुती उपाय खूप उपयोगी ठरतात. (Mix these 3 ingredients in hot water, your stomach will be clean immediately, you will not suffer from gas, indigestion and constipation.)विशेषतः ओव्याचं पाणी, जिऱ्याचं पाणी आणि कोमट पाणी यांसारखी नैसर्गिक पेयं नियमित घेतल्यास पोट साफ होण्यास मदत होते आणि पचनक्रिया सुधारते.

ओव्याचं पाणी पोटासाठी रामबाण उपाय मानले जाते. ओव्यामध्ये थायमॉल नावाचे घटक असतात, जे पचन सुधारण्यास मदत करतात. हे पाणी घेतल्याने अन्नाचे विघटन व्यवस्थित होते आणि अपचनाची समस्या कमी होते. ज्यांना गॅस, पोटात दुखणे किंवा वारंवार ढेकर येणे यासारख्या तक्रारी असतात, त्यांच्यासाठी ओव्याचं पाणी खूप फायदेशीर ठरते. सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचं पाणी घेतल्यास आतड्यांची हालचाल सुधारते आणि मलविसर्जन सुलभ होते. तसेच ओव्याचे अँटी बॅक्टेरियल गुणधर्म पोटातील हानिकारक जिवाणूंना कमी करण्यास मदत करतात.

जिऱ्याचं पाणीही पचनासाठी तितकंच उपयुक्त आहे. जिऱ्यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स आणि पचनास मदत करणारे घटक असतात. जिऱ्याचं पाणी घेतल्याने अॅसिडिटी कमी होते, भूक सुधारते आणि अन्न पचायला मदत होते. यामुळे पोट हलकं वाटतं आणि फुगण्याची समस्या कमी होते. तसेच जिऱ्याचं पाणी शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करते, ज्यामुळे शरीर अधिक निरोगी राहते. काही लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास जिऱ्याचं पाणी नियमित घेतल्याने त्यातही आराम मिळू शकतो.

कोमट पाणी हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. सकाळी उठल्यावर एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्यायल्याने पचनसंस्था सक्रिय होते. यामुळे आतड्यांची हालचाल सुरळीत होते आणि पोट साफ होण्यास मदत होते. कोमट पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते, त्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. नियमित कोमट पाणी प्यायल्याने त्वचेलाही फायदा होतो आणि शरीर हलकं व ताजंतवानं वाटतं. याशिवाय काही जण लिंबूपाणी, मध घातलेले कोमट पाणी किंवा धण्याचं पाणीही पितात, ज्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते. मात्र, कोणतेही पेय अति प्रमाणात घेणे टाळावे. आपल्या शरीराला काय सूट होते हे ओळखूनच ते नियमित घ्यावे.

Web Title : गर्म पानी और ये 3 चीजें: पाचन संबंधी समस्याओं से राहत।

Web Summary : गर्म पानी में अजवाइन, जीरा, या सादा पानी मिलाकर पीने से पाचन क्रिया सुधरती है, गैस से राहत मिलती है और कब्ज दूर होता है। ये सरल उपाय पेट के स्वास्थ्य और डिटॉक्सिफिकेशन को बढ़ावा देते हैं।

Web Title : Hot water and these 3 ingredients: Relief from digestive issues.

Web Summary : Hot water with carom, cumin, or plain, aids digestion, relieves gas, and eases constipation. These simple remedies promote gut health and detoxification for overall well-being.