Join us   

आंबे खाल्ल्याने शुगर वाढते का? आहारतज्ज्ञ सांगतात आंबे खाऊन वजन आणि शुगर नियंत्रणात कशी ठेवावी....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 12:49 PM

Mango Eating Health Benefits According To Rujuta Diwekar : हंगामी फळांचा आहारात समावेश करा. कारण यामुळे आहारात तब्येत चांगली राहण्यास मदत होते.

ऊन्हाळ्याच्या दिवसांत आंबे खाण्याची प्रत्येकाचीच इच्छा होते. (Summer Special Food) आंबा खाल्ल्याने शरीराल बरेच फायदे मिळतात.  अनेकांना आंब्याची चव खूपच आवडते ते ऊन्हाळ्याच्याचे ४ महिने फक्त आंबेच खातात. आंबा खाल्ल्याने वजन वाढत का, शुगर लेव्हल वाढते का असा प्रश्न अनेकांना पडतो. (Right Ways To Eat Mango)आंब्याच्या जवळपास  १५०० जाती आहेत. ऋजूता  दिवेकर यांनी आंबा खाल्ल्याने वजन वाढतं का शरीरातील साखरेची पातळी वाढते का यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. (Mango Eating Health Benefits According To Rujuta Diwekar) 

आंब्यातील पोषक तत्व 

नॅशलन लायब्रेरी ऑफ मेडीसिनच्या रिपोर्टनुसार  आंब्यात मोठ्या प्रमाणात एंटी ऑक्सिडेंट्स असतात. एंटी रॅडीकल्स असतात. आंबा पॉलिफेनॉल्स, कॅरोटीनॉईड्, फायबर्स आणि व्हिटामीन ई चांगाल स्त्रोत आहे.   आंब्यात फायबर्स आणि व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. रूजूता सांगतात मिनरल्स, एन्झाईम्स आपल्याला  हृदयाच्या आजारांपासून बचाव होतो. (Ref) आंब्यात जैव सक्रिय घटक असतात जे डायबिटीस आणि कॅन्सरच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात. ज्यामुळे संक्रमण आणि हृदयविकारांपासून संरक्षण होते. (Reasons Why You Should Eat Mangoes According To Star Nutritionist Rujuta Diwekar)

त्वचा आणि डोळ्यांसाठी उपयुक्त

ऋजूता सांगतात पूर्व आशिया, चीन, कुबान या देशात आयुर्वेदीक उपचारांमध्ये आंब्याचा वापर केला जातो. आंब्यात एंटी व्हायरल, एंटीबॅक्टेरियल आणि एंटी डायबेटीक गुण असतात. फ्रि रॅडडिकल्समुळे त्वचा आणि डोळ्यांचे रक्षण होण्यास मदत होते.  आंबा केवळ चवीला चांगला नसतो तर आंब्याच्या सेवनाने तब्येतीलाही बरेच फायदे मिळतात. शारीरिक आरोग्य चांगले राहण्यासाठी, त्वचेसाठी आणि मेंदूच्या विकासासाठी आंबा  उपयुक्त ठरतो. ऊन्हाळ्या्च्या दिवसांत तुम्ही आंब्याचा आहारात समावेश करू शकता. 

हंगामी फळांचा आहारात समावेश करा. कारण यामुळे आहारात तब्येत चांगली राहण्यास मदत होते.  योग्य खाणं म्हणजे हंगामी फळांच्या सेवनापासून वंचित राहणे असं नाही  नियमित व्यायामाची सवय ठेवा. वेळेवर झोपा. ही जीवनशैली अंगीकारून तुम्ही वजनावर आणि शरीरातील साखरेची पातळी वाढवण्यावर नियंत्रण ठेवू शकता.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल