Join us   

शाळांमध्ये मुलांना मिळणार ३ वॉटर ब्रेक; या ब्रेकमागचा हेतू काय? मुलांनी दिवसभरात नेमकं किती पाणी प्यावं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2024 2:00 PM

Mandatory For Schools To Give 3 Water Breaks To Students In Andhra Pradesh : उन्हाळ्यात शाळकरी विद्यार्थ्यांना डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणून, शालेय विभागाने घेतला मोठा निर्णय..

उन्हाचा तडाखा वाढल्यावर अंगाची लाही लाही होते (Summer Special). मुख्य म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना याचा त्रास जास्त होतो. उन्हात मुलं पुस्तकाचं ओझं घेऊन शाळा गाठतात (Dehydration). शिवाय गरमीमध्ये शिक्षण घेतात. याच सगळ्या गोष्टींचा विचार करत, आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) शालेय शिक्षण विभागाने, खास मुलांसाठी विशेष उपक्रम राबवला आहे.

राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी तीन ब्रेक घेणे बंधनकारक केले आहे. त्याला वॉटर-बेल असे नाव देण्यात आले असून, या अंतर्गत मुलांना पाणी पिण्यासाठी ३ वॉटर ब्रेक देण्यात येईल. जेणेकरून पाणी पिण्याची मुलांना आठवण होईल, व शरीर हायड्रेट राहील. या खास उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. शिवाय याचा आरोग्यदायी फायदा मुलांना नक्कीच होईल(Mandatory For Schools To Give 3 Water Breaks To Students In Andhra Pradesh).

मुलांना द्या ३ वॉटर-बेल ब्रेक; शरीर राहील हायड्रेट

आंध्र प्रदेशातील शालेय शिक्षण विभागाने मुलांचा विचार करता, त्यांना ३ वॉटर-बेल ब्रेक देण्याचं ठरवलं आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना सकाळी ९:४५, १०:०५ आणि ११:५० वाजता पाणी पिण्यासाठी ३ ब्रेक दिला जाईल. जेणेकरून पाणी पिण्याची मुलांना आठवण होईल. पाणी प्रत्येक जण पितो, पण बहुतांश मुलं फक्त तहान लागल्यावरच पाणी पितात. जे चुकीचे आहे. यामुळे शरीर डिहायड्रेट होते. त्यामुळे मुलांना ३  वॉटर ब्रेक देण्याचं शिक्षण विभागाने ठरवलं आहे.

तुमच्याही चेहऱ्यावर मुरुमांचे डाग-सूज आली आहे? हे वाढत्या कोलेस्टेरॉलचं तर लक्षण नाहीत ना..?

शरीरातील पाण्याची पातळी कमी आहे, हे कसे ओळखाल?

- लघवीचा रंग गडद होणे.

- डोकेदुखी.

- थकवा.

- उन्हाळी लागणे.

- बद्धकोष्ठता.

हायड्रेटेड राहण्यासाठी कोणते उपाय करावे?

शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी वेळोवेळी पाणी पिणे गरजेचं आहे. कारण उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातून भरपूर पाणी वाया जाते. त्यामुळे दररोज निदान ८ ग्लास पाणी प्यायला हवे.

जिने चढताना-चालताना दम लागतो? जीवनशैलीत करा ४ सोपे बदल; पन्नाशीनंतरही राहाल फिट

पाणी व्यतिरिक्त शरीराला हायड्रेट कसे ठेवावे?

- उन्हाळ्यात हंगामी फळे खा. कलिंगड, स्ट्रॉबेरी, अननस, संत्री, पीच, मनुका, या फळांचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत होते.

- उन्हाळ्यात जास्त भाज्या खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. काकडी, दुधी भोपळा, टोमॅटो, ब्रोकोली, कोबी, फ्लॉवर, वांगी, पालक या भाज्यांचे अधिक सेवन करा. या भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. शिवाय शरीराला अनेक पोषक घटकही मिळतात.

टॅग्स : आंध्र प्रदेशहेल्थ टिप्सआरोग्य