Join us

AI चा सल्ला ऐकून तरूणानं तीन महिने मीठ खाणं सोडलं आणि पोहोचला थेट आयसीयूत; कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 19:06 IST

Health Tips : एका तरूणाने डॉक्टरऐवजी एआयकडे आरोग्यासंबंधी सल्ला मागितला आणि त्याला आयसीयूत दाखल करावं लागलं. 

Health Tips : आर्टिफिशिअल इंटॅलिजन्सचा वापर लोक मोठ्या प्रमाणात करत आहेत. लोक AI चा वापर माहिती मिळवण्यासाठी, काम करण्यासाठी घेत आहेत. AI कडून लोक लाइफस्टाईलसंबंधी, आरोग्यासंबंधी टिप्सही घेत आहेत. पण एआयचे अनेक फायदे असले तरी अनेक नुकसानही आहेत. ChatGpt किंवा Gemini कडून सल्ला घेतला जातो. पण असं करणं महागात पडू शकतं. एका तरूणाने डॉक्टरऐवजी एआयकडे आरोग्यासंबंधी सल्ला मागितला आणि त्याला आयसीयूत दाखल करावं लागलं. 

या केसबाबतची माहिती एनल्स ऑफ इंटरनल मेडिसीन क्लीनिकल केसेस नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली. वाशिंग्टन यूनिव्हर्सिटीच्या डॉक्टरांनी सांगितलं की, एका व्यक्तीनं आपली डाएट बदलण्याचं ठरवलं. त्याला टेबल सॉल्ट (सोडिअम क्लोराइड) आहारातून पूर्णपणे काढायचं होतं. याबाबत त्यानं ChatGPT कडून सल्ला घेतला. एआयने त्याला जो पर्याय दिला, तो सोडिअम ब्रोमाइड होता.

जेवणातून काढलं मीठ

या तरूणानं मीठ खाणं बंद केलं आणि जेवणात सोडिअम ब्रोमाइड टाकणं सुरू केलं. साधारण ३ महिन्यांनी त्याची तब्येत गंभीर झाली. त्याला थेट आयसीयूत ठेवावं लागलं. त्याला मेंदुमध्ये समस्या होऊ लागल्या. जसे की भ्रम आणि त्याच्या व्यवहारातही बदल झाला होता. टेस्टमधून समजलं की, हा ब्रोमिजम म्हणजे ब्रोमाइडच्या जास्त प्रमाणामुळे झालेला एक आजार आहे. 

पाणी पिणं झालं मुश्किल

हॉस्पिटलमध्ये त्याला तहान लागली होती, पण पाणी पिण्याची भिती वाटत होती. नंतर त्याला भ्रम होऊ लागले होते आणि हॉस्पिटलमधून पळून जाण्याचा प्रयत्नही करू लागला होता. डॉक्टरांनी त्याला अॅंटी-सायकोटिक औषधांसोबतच पाणी-इलेक्ट्रोलाइट उपचार दिले. हळूहळू त्याचं डोकं जागेवर आलं आणि तेव्हा त्यानं सांगितलं की, त्याने ChatGPT कडून सल्ला घेतला होता.

काय आहे ब्रोमाइड इन्टॉक्सिकेशन?

जेव्हा आपल्या शरीरात ब्रोमाइडचं प्रमाण जास्त वाढतं, तेव्हा याला ब्रोमाइड इन्टॉक्सिकेश म्हटलं जातं. सामान्यपणे आपल्या आहारात ब्रोमाइडचं प्रमाण जास्त नसतं. पण काही औषधं, सप्लीमेंट्सच्या माध्यमातून ते शरीरात जाऊ शकतं. चिंतेची शरीरातून ब्रोमाइड लवकर निघत नाही. हे क्लोराइडसोबत मिळून सेल्सचं नुकसान करतं. जेव्हा हे शरीरात जमा होतो, तेव्हा आपल्या नर्व्हस सिस्टीमवर वाईट प्रभाव पडतो.

काय असतात लक्षणं?

डोकेदुखी

भ्रम

कमजोर स्मरणशक्ती

चक्कर येणे

चालण्यास समस्या

बोलण्यात अडथळा

हात-पायांमध्ये थरथरी

संशोधकांनी सांगितलं की, या केसवरून हे लक्षात येतं की, एआयच्या वापरानं कधी कधी रोखला जाणारा आजार गंभीरही होऊ शकतो. त्यांनी इशारा दिला आहे की, आरोग्यासंबंधी सल्ल्यांसाठी चूक करू नका. एआय टूल्स माहिती देण्यात चूक करू शकतात.

टॅग्स : आरोग्यआर्टिफिशिअल इंटेलिजन्स