Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > वयाची पन्नाशी ओलांडली तरी मलायका दिसते तरुण, इम्युनिटी वाढवण्यासाठी पिते खास ड्रिंक - प्रदूषणापासूनही होतो बचाव

वयाची पन्नाशी ओलांडली तरी मलायका दिसते तरुण, इम्युनिटी वाढवण्यासाठी पिते खास ड्रिंक - प्रदूषणापासूनही होतो बचाव

Malaika Arora fitness secrets: Malaika Arora immunity drink recipe: धूळ- प्रदूषणापासून वाचण्यासाठी मलायिका अरोरा पिते खास ड्रिंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2026 14:30 IST2026-03-30T14:26:27+5:302026-03-30T14:30:21+5:30

Malaika Arora fitness secrets: Malaika Arora immunity drink recipe: धूळ- प्रदूषणापासून वाचण्यासाठी मलायिका अरोरा पिते खास ड्रिंक

Malaika Arora secret immunity booster drink Raw turmeric and black pepper tea benefits Anti-aging secrets of Bollywood celebrities How to fight pollution and dust naturally | वयाची पन्नाशी ओलांडली तरी मलायका दिसते तरुण, इम्युनिटी वाढवण्यासाठी पिते खास ड्रिंक - प्रदूषणापासूनही होतो बचाव

वयाची पन्नाशी ओलांडली तरी मलायका दिसते तरुण, इम्युनिटी वाढवण्यासाठी पिते खास ड्रिंक - प्रदूषणापासूनही होतो बचाव

प्रत्येकाला फिटनेस आणि हेल्दी लाइफस्टाईलसाठी बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींच्या डेली रुटीनबद्दल जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता अनेकजणींमध्ये असते. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेते. वयाची पन्नाशी ओलांडली तरी ती तितकीच फिट आणि तरुण दिसते.(Malaika Arora fitness secrets) ती आपल्या योगाभ्यासासाठीच नाही तर तिच्या आहारामुळेही नेहमी चर्चेत असते.(Malaika Arora immunity drink recipe) सध्याच्या काळात वाढते प्रदूषण, हवेतील धूळ आणि बदलती जीवनशैली यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते आहे. यामुळे वारंवार होणारे आजार, थकवा आणि त्वचेवर दिसणारा वयाचा प्रभाव यावर मलायका अरोरा एक अतिशय सोपा आणि नैसर्गिक उपाय करते. (Best drink for glowing skin and immunity)

केस झाडूसारखे कोरडे, रुक्ष झाले? घरी करा १० रुपयांत हेअर स्पा, केस होतील रेशमासारखे मऊ- सुळसुळीत

कर्ली टेल्सवर कामिया जानीसोबतच्या मुलाखतीत तिने जीवनशैली आणि आरोग्याच्या रहस्यांबद्दल सांगितलं, ज्यामुळे ५० व्या वर्षीही ती फिट आणि तरुण दिसते. मलायका अरोरा तिच्या योग्य नित्यक्रमाचे पालन करते, ज्यामुळे ती तंदुरुस्त आणि निरोगी राहते. योग आणि व्यायामाव्यतिरिक्त ती आपल्या आहारावरही लक्ष देते. सकाळच्या रुटीनमध्ये तिने वॉटर शॉट्स पिते असं सांगितलं. चांगल्या आरोग्यासाठी ती सकाळी उठल्याबरोबर वॉटर शॉर्ट्स घेते. ज्यात इम्युनिटी शॉट, डायजेस्टिव्ह शॉट आणि ग्लो शॉटचा समावेश आहे. 

वाढत्या प्रदूषणामुळे इम्युनिटीवर परिणाम होतो असं तिने सांगितलं त्यामुळे ती कच्ची किंवा ताजी ओली हळद,आले पुदिन्याची पाने आणि तुळशीच्या पानांचे ड्रिंक पिते. यासाठी किसलेली कच्ची हळद, तुळशीची पाने आणि पुदिन्याची पाने मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट करते. त्यात नारळाचे पाणी आणि चिया सीड्स घालून पिते. हे ड्रिंक सर्दी-खोकल्यावर रामबाण आहे. धूळ आणि प्रदूषणाच्या वातावरणात गोळ्या आणि औषधे घेण्याऐवजी हे ड्रिंक प्यायला हवं. 

तसंच मलायिका अरोरा म्हणते कॉफी माझ्या शरीरासाठी चांगली नाही. त्यासाठी मी एक चमचा शुद्ध तूप घेते. आहारात डाळ, चपातीचा समावेश असतो. कच्च्या हळदीमध्ये कर्क्यूमिन आणि दाहशामक, अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. तर आले पचन, रक्ताभिसरण आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते. या शॉर्ट्समध्ये असणारे घटक आपली इम्युनिटी वाढवण्याचे काम करतात. तसेच शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. असं आहारातज्ज्ञ गरिमा गोयल यांनी म्हटलं

आहारात आपण पुरेसे प्रथिने आणि झोप घ्यायला हवी. शहरांमधील वाढत्या प्रदूषणामुळे आपल्या फुफ्फुसांवर आणि त्वचेवर विपरीत परिणाम होतो. हळदीमधील 'करक्युमिन' (Curcumin) हे घटक शरीरातील दाह (Inflammation) कमी करण्यास मदत करतात. यात काळीमिरीशिवाय शरीर हळदीमधील 'करक्युमिन' पूर्णपणे शोषू शकत नाही. त्यामुळे, हे मिश्रण प्रदूषणाने होणारा संसर्ग रोखण्यासाठी एक संरक्षक कवच म्हणून काम करते.

Web Title : मलाइका अरोड़ा का एंटी-एजिंग रहस्य: युवा त्वचा के लिए इम्यूनिटी ड्रिंक

Web Summary : 50 के बाद भी मलाइका अरोड़ा योग और एक विशेष इम्यूनिटी बढ़ाने वाले पेय से फिट रहती हैं। हल्दी, अदरक, पुदीना और तुलसी से बना यह पेय प्रदूषण के प्रभावों से लड़ने और प्रतिरक्षा को मजबूत करने में मदद करता है। वह कॉफी से परहेज करती हैं, घी और संतुलित आहार पसंद करती हैं।

Web Title : Malaika Arora's anti-aging secret: Immunity drink for youthful skin.

Web Summary : Malaika Arora, even after 50, stays fit with yoga and a special immunity-boosting drink. This drink, made with turmeric, ginger, mint, and tulsi, helps combat pollution's effects and strengthens immunity. She avoids coffee, opting for ghee and a balanced diet.