Join us
Daily Top 2 Weekly Top 5

गट हेल्थ सुधारण्यासाठी मलायका अरोरा पिते गोल्डन ड्रिंक, पाण्यात मिसळा २ गोष्टी- त्वचाही राहिल नितळ चमकदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2026 16:35 IST

Malaika Arora golden drink: Gut health drink: Golden drink for digestion: गट हेल्थ सुधारण्यासाठी मलायका अरोरा करते खास उपाय..

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात स्वत:ला फिट ठेवणं आणि त्वचेची काळजी घेणं या दोन्ही गोष्टी आव्हानात्मक झाल्या आहेत. पण काही साध्या आणि नैसर्गिक उपायांनी शरीराची देखभाल करणं अगदी शक्य आहे. बॉलिवूड सेलिब्रेटी मलायका अरोरा ही तिच्या फिटनेस आणि ग्लोइंग स्किनसाठी ओळखली जाते.(Malaika Arora golden drink) वयाच्या ५२ वर्षी देखील ती तिच्या सुंदर, तंदुरुस्त आणि टोनड बॉडीने अनेकांना प्रेरित करते. नियमित व्यायाम आणि चांगला आहार खाते. (Gut health drink) अनेक मुलाखतीत तिने सांगितलं की ती कोणतेही क्रॅश डाएट करत नाही.(Golden drink for digestion)  साधे घरगुती उपाय करुन ती आरोग्याची काळजी घेते. मुलाखतीत तिने तिचे खास मॉर्निंग हेल्थ ड्रिंक देखील शेअर केले, जे तिच्या मते आतड्याच्या आरोग्यासाठी आणि एकूण शरीरासाठी फायदेशीर आहे. पाहूयात या खास गोल्डन ड्रिंकबद्दल. 

शेंगांची टरफले फेकू नका! फाटलेल्या टाचांसाठी 'असा' करा फूट मास्क, पाय होतील मऊ- भेगाही भरतील

ती म्हणते आतड्यांचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. ते आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवते. यासाठी महागड्या किंवा विशेष गोष्टींची आवश्यकता नाही. यासाठी आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या गोष्टी पुरेशा असतात. हे गोल्डन ड्रिंक बनवण्यासाठी ती रात्री जिरे, ओवा आणि बडीशेप हलकी भाजते. आणि रात्रभर हे पाण्यात भिजवते. 

सकाळी या पाण्याता उकळवून कोमट झाल्यानंतर त्यात थोडा लिंबाचा रस घालते. आणि रिकाम्या पोटी हे खास ड्रिंक पिते. या साध्या घरगुती उपायांमुळे तिचे पचन सुधारते आणि आतड्यांचे आरोग्य देखील मजबूत राहते. हे गोल्डन ड्रिंक बनवायला देखील अगदी सोपे आहे. 

या पाण्यामुळे दिवसभर आपण ऊर्जात्मक राहतो. यात असणारे घटक हे त्वचेवरील डाग, पिंपल्स आणि लालसरपणा कमी करतात. ज्यामुळे त्वचा चांगल्यापद्धतीने मॉइश्चरायझ, चमकदार होते. तसेच गट हेल्थ सुधारल्याने त्वचेला वेगळी चमक मिळते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Malaika Arora's golden drink for gut health and glowing skin.

Web Summary : Malaika Arora, known for her fitness, shared her morning drink recipe. It includes cumin, carom seeds, fennel seeds, and lemon. This drink aids digestion, improves gut health, reduces skin issues, and keeps you energized all day, contributing to radiant skin.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स