Join us

९० टक्के लोकांचं डोकं 'या' एकाच कारणामुळे दुखतं! म्हणूनच डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास टाळण्यासाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2025 09:25 IST

Major Reason For Headache And Migraine: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास तुम्हाला नेहमीच होत असेल तर त्यामागे हे कारण असू शकतं....(3 tips to get instant relief from headache and migraine)

ठळक मुद्दे डोकेदुखीत्रा त्रास होण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे याविषयीची माहिती

डोकं दुखणं ही समस्या बहुतांश जणांना नेहमीच छळत असते. 'आज माझं खूप डोकं दुखतंय', 'डोकं अगदी ठणकतंय' अशी वाक्य आपण आपल्या अवतीभोवती असणाऱ्या व्यक्तींकडून नेहमीच ऐकत असतो. कधी कधी ही वाक्यं आपल्या तोंडातूनही बाहेर येत असतात. डोकं दुखण्याच्या बाबतीत तर महिलांचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत खूप जास्त आहे. बऱ्याच जणींचं डोकं नेहमीच दुखत असतं. त्यासाठी त्यांना वारंवार पेनकिलरसुद्धा घ्याव्या लागतात (Major Reason For Headache And Migraine). हा त्रास कमी करण्यासाठी आहारतज्ज्ञांनी खूप सोपा आणि उत्तम उपाय सांगितला आहे.(3 tips to get instant relief from headache and migraine)

 

डाेकेदुखी होण्यामागची कारणं आणि ती कमी करण्यासाठी उपाय

डोकेदुखीत्रा त्रास होण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे याविषयीची माहिती देणारा व्हिडिओ vocalwavehub या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

शिवजयंती २०२५: पारंपरिक वेशभुषा करून मिरवणुकीत दाखवा मराठमोळा बाणा, ५ मेकअप टिप्स..

यामध्ये आहारतज्ज्ञ सांगत आहेत की बहुतांश लोकांच्या डोकेदुखीमागे किंवा मायग्रेनच्या त्रासामागे हेच कारण असतं की त्यांच्या मेंदूला योग्य तेवढा ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. जर तुम्ही पाणी कमी पित असाल, तुमचं जेवण वेळेवर होत नसेल किंवा तुम्ही श्वास खूप अपूरा किंवा शाॅर्ट ब्रिदींग करत असाल तर तुमच्या मेंदूला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे मग डोकेदुखीचा किंवा मायग्रेनचा त्रास व्हायला सुरुवात होते. त्यांच्यामते ९० टक्के लोकांच्या डोकेदुखीमागे हेच मुख्य कारण आहे.

 

डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी उपाय

१. डॉक्टर सांगत आहेत की जर तुम्हाला डोकेदुखीचा किंवा मायग्रेनचा त्रास सुरू झाला तर सगळ्यात आधी पाणी प्या. पाण्यातून ऑक्सिजन मिळते आणि डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.

जेवताना पाणी प्यावं की जेवण झाल्यानंतर? डॉक्टर सांगतात पाण्याच्या बाबतीत 'हा' नियम पाळाच

२. डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी लगेचच पुरेसा आहार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सकस, पौष्टिक घरी तयार केलेले पदार्थ खा.

३. तिसरा उपाय म्हणजे डिप ब्रिदिंग किंवा दिर्घश्वसन. दिर्घ श्वसन काही मिनिटे केल्यानंतर आपोआपच शरीरातील रक्ताभिसरण उत्तम होऊन शरीराला तसेच मेंदूला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळण्यास मदत होते.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडी